कोल्हापूर - लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची 147 वी जयंती आज मोठ्या उत्साहात पार पडले. कसबा बावडा येथील शाहू जन्म स्थळ येथे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी खासदार संभाजी राजे छत्रपति यांची उपस्थिती होती. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. राज्य सरकारच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता मराठा आरक्षणाबाबत केंद्राने पावले उचलावीत, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.
मोजक्याच अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सोहळा
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची आज 147 वी जयंती आहे. त्यानिमित्ताने आज कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळाचा ठिकाणी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही मोजक्याच अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या सोहळ्याप्रसंगी पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संभाजीराजे छत्रपती, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शाहू जन्मस्थळाच्या विकासाबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांनी आढावा घेतला.
आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक
यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी शाहू जयंतीच्या शुभेच्छा देत मराठा आरक्षणबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठा आरक्षणात चा चेंडू आता केंद्राच्या हातात आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत. राज्यसरकारच्या हातात ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी मार्गी लावण्याचे काम राज्य सरकार करत आहे. आता केंद्र सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री सतीश पाटील यांनी दिली.
मराठा आरक्षण हे केंद्राच्या हातात
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मूक आंदोलन सुरू केल्यानंतर विनाविलंब मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याची पूर्ण करण्याची तयारी सुरू झाली आहे. सारथीचे उपकेंद्र कोल्हापुरात व्हावे, अशी मागणी होती. ही मागणी मान्य झाल्याने आम्हाला आनंद होत आहे. उर्वरित मागण्या 21 दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे. मात्र, मराठा आरक्षण हे केंद्राच्या हातात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी केंद्राचे अधिवेशन घ्यावे. तसेच भाजपने मराठा समाजाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनी हातात हात घालून मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.