कोल्हापूर : राज ठाकरे हे अयोध्येला जात ( Raj Thackeray Ayodhya Visit ) आहेत. मात्र ते नेमकं कशासाठी जात आहेत, हे माहित नाही. राज ठाकरे हे भाजपचे बाहुले ( Raj Thackeray is BJPs Puppet ) बनून काम करत असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. कोल्हापुरात ते बोलत ( Jayant Patil Criticized Raj Thackeray ) होते.
शिरोळमध्ये कोल्हापुरातील पहिली सभा : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा आज कोल्हापूर ( NCP Pariwar Sanvad Yatra Kolhapur ) जिल्ह्यात आली आहे. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात पहिली सभा पार पडली असून, येत्या 23 तारखेला खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात सांगता होणार आहे. दरम्यान आज शिरोळ येथे पार पडलेल्या संवाद यात्रेदरम्यान जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आणि पक्ष बळकट करण्यासाठी यात्रा सुरू असल्याचे सांगितले आहे.
नारायण राणे जेष्ठ नेते : दरम्यान, काल नारायण राणेंनी महाविकास आघाडी कोसळणार असल्याची नवीन तारीख जाहीर केली आहे. यावर जयंत पाटील यांनी, 'ते ज्येष्ठ नेते आहेत. भाजप दरवेळेस नवीन तारीख जाहीर करते आणि तोंडावर पडते. नारायण राणेंकडे काही माहिती असेल म्हणून ते बोलत आहेत, असे ते म्हणाले ( Jayant Patil Criticized Narayan Rane ) आहेत.
राजू शेट्टींची भेट घेणार : महाविकास आघाडी सरकारने वादळ, अतिवृष्टी यामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जेवढी मदत केली, तेवढी मदत आजपर्यंत कोणी केली नाही. मात्र, तरीही राजू शेट्टी हे नेमके कोणत्या मुद्द्यामुळे आघाडीतून बाहेर पडत आहेत, हे कळत नाही. मी दौऱ्यात असल्याने अद्याप त्यांची भेट होऊ शकलेली नाही. मात्र, मी त्यांची लवकरच भेट घेणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले ( Jayant Patil On Raju Shetty ) आहेत.
उत्तर प्रदेश, गुजरात, मध्यप्रदेशातील भोंगे पाहावेत : राज ठाकरे हे अयोध्येला जात आहेत. मात्र ते नेमकं कशासाठी जात आहेत हे माहीत नाही. मात्र, राज ठाकरे हे भाजपच बाहुल बनून काम करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे राज ठाकरेंच्या दौऱ्याची योगी सरकारने सुसज्ज व्यवस्था केली आहे. ते उत्तर प्रदेशला चालले आहेत तर तेथेही मस्जिदवरचे भोंगे ( Loudspeakers On Mosque ) चालू आहेत का हे पहावे. तसेच गुजरात, मध्यप्रदेश तसेच जिथे जिथे भाजप सरकार आहे तेथे जाऊन पाहावं. जर तेथे भोंगे चालू असतील तर महाराष्ट्रात भोंगे ( Loudspeakers In Maharashtra ) बंद करण्याचा कोणताही नैतिक अधिकार भारतीय जनता पार्टी तसेच राज ठाकरे यांना नाही, असे जयंत पाटील म्हणाले आहेत.
धर्माचं राजकारण करत नाही : आम्ही ही देव भक्ती करतो. दरवर्षी घरात गणपती ही बसवतो. मात्र आम्ही लोकांपुढे मत मागण्यास धर्माचं कारण घेऊन जात नाही. आम्ही ही हिंदूच आहोत. त्यांच्यापेक्षाही कडकपणे आम्ही हिंदू धर्म पाळतो. आम्ही आमचा धर्म घेऊन रस्त्यावर फिरत नाही किंवा दुसर्या धर्माचा द्वेष करत नाही, अशी आमची भूमिका आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशनुसार, एका ठराविक मर्यादेत भोंग्यांचा आवाज असेल तर मग ते मस्जिद असो नाहीतर अन्य धार्मिक स्थळे त्यास परवानगी असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत.
हेही वाचा : Dhananjay Munde Criticized Raj Thackeray : .. राज ठाकरे म्हणजे अर्धवटराव - धनंजय मुंडे