ETV Bharat / state

ओबीसी जागर रथयात्रा कोल्हापुरात... राजकीय आरक्षण मिळेपर्यंत भाजप संघर्ष करणार - राहुल चिकोडे - राजकीय आरक्षण

भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारने मराठा, ओबीसी यांचे आरक्षण घालविण्याचे काम केले आहे. राज्यात सध्या फक्त स्थगिती, अन्याय, वसुली, भ्रष्टाचार अशी परिस्थिती आहे. या सरकारला जनतेच्या प्रश्नांचा विसर पडला आहे

ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भाजपा संघर्ष करणार

author img

By

Published : Nov 20, 2021, 8:27 PM IST

कोल्हापूर- ओबीसींना राजकीय आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत भाजप संघर्ष करणार, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षणाच्या जनजागृतीसाठी ओबीसी जागर रथयात्रा (OBC Jagar Rathyatra in Kolhapur) काढण्यात येत आहे. आज हा रथ कोल्हापूर येथे दाखल झाल्यावर ते बोलत होते.

भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे (Kolhapur district president Rahul Chikode) म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारने मराठा, ओबीसी यांचे आरक्षण घालविण्याचे काम केले आहे. राज्यात सध्या फक्त स्थगिती, अन्याय, वसुली, भ्रष्टाचार अशी परिस्थिती आहे. या सरकारला जनतेच्या प्रश्नांचा विसर पडला आहे. ओबीसी आरक्षणासाठी ठाकरे सरकारने 15 महिन्यांच्या 7 तारखांमध्ये फक्त तारीख पे तारीख असा खेळ केला आहे.

ओबीसी जागर रथयात्रा कोल्हापुरात

हेही वाचा-ED summons to Bhavana Gawali : शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांना ईडीकडून पुन्हा समन्स

पुढील तीन दिवस कोल्हापुरात ओबीसी जागर रथयात्रा

ओबीसी जागर रथयात्रा आज पूर्ण दिवस शहरातील प्रमुख चौक तसेच परिसरात तर पुढील तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात करवीर, गडहिंग्लज, कागल, पट्टण कडोली, हुपरी, कुरुंदवाड अब्दुल लाट, शिरोळ अशा तालुक्यांच्या ठिकाणी प्रवास करणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथे या रथ यात्रेचा समारोप होणार आहे. या ओबीसी जागर रथयात्रामध्ये भाजप व मोदी सरकारने घेतलेले ओबीसींसाठीचे ऐतिहासिक निर्णय, महाराष्ट्र राज्यात भाजप व फडणवीस सरकारने घेतलेले ओबीसींसाठीचे ऐतिहासिक (OBC Rathyatra in Maharashtra) निर्णय याबाबत टीव्ही स्क्रीनच्या व माहिती पत्रकाच्या माध्यमातून प्रसार करण्यात येत आहे.

हेही वाचा-नाशिक : डॉक्टर वधूची होणार कौमार्य चाचणी? अंनिसची त्र्यंबकेश्वर पोलिसांत तक्रार

ओबीसी बांधवांनी अन्यायाविरुद्ध एकत्र येऊन लढा देण्याची आवश्यकता

भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे (Rahul Chikode Slammed Mahavikas Aghadi) म्हणाले, ओबीसी बांधवांनी खऱ्या अर्थाने जागे होऊन अन्याया विरुद्ध एकत्र येऊन लढा देण्याची आवश्यकता आहे. येत्या काळात संघर्षाची भूमिका घेत ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी, घरोघरी जाऊन सरकारने केलेल्या अन्यायाचा पाढा जनतेसमोर मांडण्यासाठी हे जागर अभियान महत्वपूर्ण ठरेल. तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण जाण्याचा फटका कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या लोकांनाही बसला आहे. त्यांनीदेखील हे ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केले.

हेही वाचा-Clean Survey 2021 : स्वच्छ सर्वेक्षणात पुण्याची बाजी, स्पर्धेत पुणे देशात पाचवे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.