ETV Bharat / state

कोल्हापुरात लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेने रोखला पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग - लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांड

कोल्हापुरात आज शिवसेनेच्या वतीने पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. जवळपास अर्धा तास पुणे बंगळुरू महामार्गावर ठिय्या मारल्याने दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. आज सकाळी आठ वाजता शिवसेनेकडून हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान कोल्हापूर पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. शिवसेनेकडून भाजपच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत सकाळी आठ वाजता हा राष्ट्रीय महामार्ग रोखला.

शिवसेनेने रोखला पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग

author img

By

Published : Oct 11, 2021, 9:30 AM IST

Updated : Oct 11, 2021, 11:48 AM IST

कोल्हापूर- उत्तर प्रदेशमधील लखीमपूर येथे झालेल्या शेतकरी हत्याकांडाचा निषेधार्थ आज(सोमवारी) शिवसेनेने कोल्हापुरात पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरला. लखीमपूर येथील हिंसाचाराला कारणीभूत ठरलेल्या आरोपींवर कडक कारवाई करून भाजपचा निषेध करण्यात आला. जवळपास अर्धा तास महामार्ग रोखून धरल्याने वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शिवसेना रस्त्यावर राहून आंदोलन करतच राहील, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिला. दरम्यान आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

शिवसेनेने रोखला पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग
लखीमपूर येथे झालेल्या घटनेचा निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात आज शिवसेनेच्या वतीने पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला. जवळपास अर्धा तास पुणे बंगळुरू महामार्गावर ठिय्या मारल्याने दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. आज सकाळी आठ वाजता शिवसेनेकडून हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान कोल्हापूर पोलिसांनी राष्ट्रीय महामार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. शिवसेनेकडून भाजपच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत सकाळी आठ वाजता हा राष्ट्रीय महामार्ग रोखला. तसेच या ठिकाणी ठिय्या मारत उत्तर प्रदेश व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

देशातील नागरिकांना लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. तो अधिकार घटनेने दिला आहे. मात्र उत्तर प्रदेश मधील घटना ही लोकशाहीचा खून करणारी आहे. शेतकरी आपला कैवारी आहे. आपला अन्नदाता आहे. मात्र शेतकऱ्याला मोडीत काढण्याचे काम भाजप सरकार करत आहे. आम्ही नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने लढण्यास तयार आहोत. असा इशारा शिवसेनेने देत भाजपचा निषेध केला. दरम्यान पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेतले. यावेळी मोठा तणाव निर्माण झाला होता.

हेही वाचा - LIVE UPDATE : लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंदची हाक, वाचा सर्व अपडेट एका क्लिकवर

हेही वाचा - कोरोना लस प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवण्यासाठी याचिका दाखल; उच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

Last Updated : Oct 11, 2021, 11:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.