ETV Bharat / state

Prithviraj Chavan On Modi: पंतप्रधान मोदींची देशभरातून जादू घटली; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे भाजपवर टीकास्त्र - भारतीय अर्थव्यवस्थेला उध्वस्त करण्याचे काम

नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून त्यांना आम्ही नऊ प्रश्न विचारत आहोत. त्यांनी त्याची उत्तरे द्यावीत. भारतीय अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याचे काम गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारकडून करण्यात आले. असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केला. ते कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

Prithviraj Chavan On Modi
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
author img

By

Published : May 26, 2023, 9:30 PM IST

माहिती देताना पृथ्वीराज चव्हाण

कोल्हापूर: केंद्रातील मोदी सरकारला आज नऊ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने कोल्हापूर दौऱ्यावर आलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला नऊ प्रश्न विचारले आहेत. मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था विस्कळीत झाली असून शेतकऱ्यांचे प्रश्न जसेच्या तसे आहेत. चीनने भारताचा भूभाग बळकावला तरीही इतक्या गंभीर विषयावर संसदेत चर्चा होत नाही. कर्नाटक विधानसभेच्या निकालावरून देशभरातून मोदींची जादू घटली आहे. अशी टीका यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याचे काम : नव्या संसदेच्या उद्घाटनाला भारतीय संसदेचे महत्त्वाचे घटक असलेल्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींना निमंत्रण दिले नसल्याच्या निषेधार्थ, 19 घटक पक्षाने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. केंद्रात मोदी सरकार स्थापन झाल्यानंतर देशावरील कर्जाचा आकडा 29 लाख कोटीवरून 135 लाख कोटी झाला. सरकारी कंपन्यांची विक्री सुरू आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करू असे आश्वासन दिले होते, खरंच देशभरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले का? शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या आहेत का?

मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था विस्कळीत झाली असून शेतकऱ्यांचे प्रश्न जसेच्या तसे आहेत.कर्नाटक विधानसभेच्या निकालावरून देशभरातून मोदींची जादू घटली आहे.- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

मागासवर्गीयांच्या योजना बंद : पंतप्रधान मोदींची जवळीक असलेल्या ठराविक मित्राना टेंडर देण्यात आली. अदाणी उद्योग समूहाला उत्पन्न मिळवून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धन्यता मानली. मोदी सरकारच्या काळात जातीय तणाव वाढला, लव्ह जिहाद सारखे प्रश्न धार्मिक तेढ वाढवणारी प्रकरणे नऊ वर्षात जास्त चर्चिली गेली. देशभरातील मागास समाजासाठी सामाजिक न्याय विभाग कार्यरत आहे. मात्र मोदी सरकारच्या काळात मागासवर्गीयांच्या योजना बंद करण्याचे पाप मोदी सरकारने केल्याचे टीकास्त्र यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी सोडले.

शिंदे-फडणवीस सरकार निवडणुकींना घाबरते: राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाला तरी, गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजूनही जाहीर झालेल्या नाहीत. राज्यातील जिल्हा परिषदा महानगरपालिका यांची मुदत संपली आहे. मात्र शिंदे फडणवीस सरकारने कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा धसका घेतला आहे. निवडणुका लागल्या तर यांनी होणाऱ्या निवडणुकीत पराभूत होण्याची भीती शिंदे -फडणवीस सरकारला आहे. त्यामुळेच अजूनही निवडणुका जाहीर होत नाहीत, राज्यातील सरकार निवडणुकांना घाबरते अशी टीकाही यावी चव्हाण यांनी केली.

नोट बंद करणे म्हणजे निव्वळ वेडेपणा: आठ नोव्हेंबर 2016 रोजी केंद्रातील मोदी सरकारने 500 आणि हजारांच्या नोटा बंद केल्या होत्या. नोटाबंदी करण्याचा उद्देशच सफल झाला नाही. देशभरासह विदेशातील काळा पैसा बाहेर काढण्याचे मोदींचे धोरण होते. मात्र त्याला हडताळ फासला गेला, दोन हजारांची नोट बंद करणे म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे. आरबीआयने पुन्हा एक हजारांची नोट सुरू करावी अशी मागणी ही यावेळी चव्हाण यांनी केली.

हेही वाचा -

  1. Prithviraj Chavan on Karnataka Result काँग्रेसला स्पष्ट बहुमत हा पराभव भाजप सहजासहजी सहन करणार नाही पृथ्वीराज चव्हाण
  2. Prithviraj Chavan राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे वक्तव्य
  3. Prithviraj Chavan On Lokayukta Reform Bill सत्ताधाऱ्यांनी अधिवेशन गुंडाळल्याने लोकायुक्त सुधार विधेयक पुन्हा चर्चेला यावे पृथ्वीराज चव्हाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.