ETV Bharat / state

कोल्हापुरात कैद्याने केला तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला, कळंबा जेलमधील प्रकार - Prisoner attacked on warden in Kolhapur,

कोल्हापुरात कळंबा जेलची तपासणी करताना तुरुंगाधिकारी प्रवीण औंढेकर यांच्यावर एका कैद्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. प्रवीण औंढेकर यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात कैद्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

कैद्याचा तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला
कैद्याचा तुरुंगाधिकाऱ्यावर हल्ला
author img

By

Published : Apr 1, 2021, 9:35 AM IST

कोल्हापूर- अंतर्गत कारागृहाची तपासणी करताना तुरुंगाधिकारी प्रवीण औंढेकर यांच्यावर एका कैद्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. कळंबा मध्यवर्ती कारागृहात हा प्रकार घडला. दरम्यान, प्रवीण औंढेकर यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात कैद्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

हेही वाचा - सांगलीत दुचाकी चोरास अटक

पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तुरुंगाधिकारी प्रवीण औंढेकर हे मंगळवारी (दि.३०) रोजी तुरुंगाची अंतर्गत पाहणी करत होते. पाहणीत कैद्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. कैद्यांसोबत चर्चा सुरू असताना करण प्रकाश सूर्यवंशी (वय.३६ रा. गार्डी, खानापूर,सांगली) हा अचानक औंढेकर यांच्या अंगावर धावून गेला. मोठमोठ्याने आरडाओरड करत त्यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सोबत असलेल्या कैद्यांनी व कर्मचाऱ्यांनी सूर्यवंशीला बाजूला केले.सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तुरुंगाधिकारी प्रवीण औंढेकर यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.