ETV Bharat / state

पानसरे हत्या प्रकरण : शरद कळसकरला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी - case

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणामधील नववा संशयित आरोपी शरद कळसकर याला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पानसरे हत्या प्रकरण : शरद कळसकरला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी
author img

By

Published : Jun 11, 2019, 4:11 PM IST

कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणामधील नववा संशयित आरोपी शरद कळसकर याला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पानसरे हत्या प्रकरणामध्ये हत्येपूर्वी त्याने कोल्हापूरमध्ये वास्तव्य केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. शिवाय त्याच्याकडे हत्येमध्ये वापरण्यात आलेल्या पिस्तुलाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी देण्यात आली होती, अशी माहितीही आज कोल्हापूर एसआयटीने न्यायालयाला दिली आहे.

पानसरे हत्या प्रकरण : शरद कळसकरला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी

कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापूर एसआयटीने तपास करत यापूर्वी 8 आरोपींची नावे समोर आणली आहेत. यातील 7 आरोपींना यापूर्वीच अटक झाली असून विनय पोवार आणि सारंग अकोळकर हे 2 संशयित आरोपी अद्याप फरार आहेत.

या प्रकरणामध्ये आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळण्यासाठी पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केलेली कारणे-

  1. कॉम्रेड पानसरे यांच्यावर गोळीबार झाला त्या घटनेच्या अगोदर 5 ते 6 दिवस जंभोटी, किणये (ता. बेळगाव) येथे झालेले प्रशिक्षण व त्या रात्री बेळगाव बसस्थानकावर कॉम्रेड पानसरे हत्त्येच्या कटाची झालेली बैठक, याबाबत त्यांच्याकडे अधिक तपास करून त्या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या अनोळखी 3 व्यक्तींबाबत त्यांच्याकडे तपास करणे गरजेचे आहे.
  2. शिवाय शरद कळसकर याने बेळगाव तसेच कोल्हापूर येथे पिस्तूल तयार करण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने तयार केलेल्या पिस्तुलाचा वापर या गुन्ह्यात झाला आहे का? याबाबत सुद्धा तपास करणे गरजेचे आहे.
  3. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल घटनेपूर्वी कोणाकडे ठेवले होते. ते पिस्तूल कोल्हापूरमध्ये कोणी आणले आणि कोणाकडे दिले याचा शोध घ्यायचा आहे.

आतापर्यंत गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे -

  1. समीर विष्णू गायकवाड
  2. वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे
  3. विनय बाबुराव पोवार (फरार)
  4. सारंग दिलीप अकोळकर (फरार)
  5. अमोल अरविंद काळे
  6. वासुदेव भगवान सूर्यवंशी
  7. भरत जयवनच्या कुरणे
  8. अमित रामचंद्र देगवेकर
  9. शरद भाऊसाहेब कळसकर

Intro:कोल्हापूर - कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणांमधील नववा संशयित आरोपी शरद कळसकर याला 18 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पानसरे हत्या प्रकरणामध्ये हत्येपूर्वी त्याने कोल्हापूरमध्ये वास्तव्य केले असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. शिवाय त्याच्याकडे हत्येमध्ये वापरण्यात आलेल्या पिस्तुलची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी देण्यात आली होती अशी माहिती आज कोल्हापूर एसआयटीने कोर्टाला दिली आहे. कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणात कोल्हापूर एसआयटीने तपास करत यापूर्वी आठ आरोपींची नावे समोर आणली आहेत. यातील सात आरोपींना यापूर्वीच अटक दाखवली असून विनय पोवार आणि सारंग अकोळकर हे दोन संशयित आरोपी अद्याप फरार आहेत. Body:आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळण्यासाठी पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केलेली कारणे :

1) कॉम्रेड पानसरे यांच्यावर गोळीबार झाला त्या घटनेच्या अगोदर पाच ते सहा दिवस जंभोटी, किणये ता. बेळगाव येथे झालेले प्रशिक्षण व त्या रात्री बेळगाव एसटी स्टॅंडवर कॉम्रेड पानसरे हत्त्येच्या कटाची झालेली बैठक याबाबत त्यांच्याकडे अधिक तपास करून त्या बैठकीमध्ये उपस्थित असलेली अनोळखी तीन व्यक्तींबाबत त्यांच्याकडे तपास करणे गरजेचे आहे.

2) शिवाय शरद कळसकर याने बेळगाव तसेच कोल्हापूर येथे पिस्तूल तयार करण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने तयार केलेल्या पिस्तूलचा वापर या गुन्ह्यात झाला आहे का याबाबत सुद्धा तपास करणे गरजेचे आहे.

3) गुन्ह्यात गुन्ह्यात वापरलेले पुस्तुल घटनेपूर्वी कोणाकडे ठेवले होते. ते पिस्तुल कोल्हापूर मध्ये कोणी आणले आणि कोणाकडे दिले याचा शोध घ्यायचा आहे.

आज पर्यंत गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे :
1) समीर विष्णू गायकवाड
2) वीरेंद्रसिंह शरदचंद्र तावडे
3) विनय बाबुराव पोवार (फरारी)
4) सारंग दिलीप अकोळकर (फरारी)
5) अमोल अरविंद काळे
6) वासुदेव भगवान सूर्यवंशी
7) भरत जयवनच्या कुरणे
8) अमित रामचंद्र देगवेकर
9) शरद भाऊसाहेब कळसकर
Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.