कोल्हापूर : कोल्हापुरातील फुलेवाडी येथील ऋग्वेदा मोरे फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजू मोरे यांनी जीर्ण देवदेवतांच्या फोटोंचा पुनर्वापर उपक्रम कोल्हापुरातील पंचगंगा नदी, शिंगणापूर घाट, प्रयाग चिखली या ठिकाणी राबवला होता. त्याला समाजातूनही उदंड प्रतिसाद मिळाला. आता राजू मोरे यांच्या कार्याची दखल आता कार्यालयाने घेतली आहे. शुक्रवारी पीएमओ ऑफिसने राजू मोरे यांना संपर्क करून त्याबाबतची माहिती त्यांना दिली. रविवारी सायंकाळी चार वाजता पीएमओ ऑफिसकडून त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 'मन की बात'मध्ये सन्मानित करण्यात येणार आहे.
जीर्ण फोटोंना पंचगंगा नदीघाटावर आसरा : कोल्हापुरातील पंचगंगा नदी, जवळील पिंपळ झाडा जवळचा दगडी घाट, कोटीतीर्थ तलाव, प्रयाग चिखली संगम, रंकाळा तलावाचा कटडा, शिंगणापूर घाट या ठिकाणी जीर्ण झालेल्या देवदेवतांच्या फोटोंना आसरा मिळाला आहे. मात्र उघड्यावर पडणाऱ्या हिंदू देव-देवतांच्या फोटोंची विटंबना होण्याची शक्यता असते. पानवट्यावर पडणारे हे फोटो जमा करून त्यांचा पुनर्वापर करण्याची संकल्पना ऋग्वेदा फाउंडेशनचे अध्यक्ष राजू मोरे यांनी सुरू केली आहे. आतापर्यंत साडेतीन हजार फोटो त्यांनी जमा केले आहेत.
एक कॉल, प्रॉब्लेम सॉल : घरामध्ये अडगळीत पडणारे देव देवतांचे आणि दिवंगत व्यक्तींचे फोटो रस्त्यावर कुठेही टाकू नका, ते फोटो आमच्याकडे द्या, आम्ही त्या फोटोचा पुनर्वापर करून लगद्यापासून मूर्ती, फोटोची काच प्रेम व्यावसायिकांना मोफत देतो. फोटोची विटंबना होणार नाही, त्यासाठी आम्ही या फोटोला श्रद्धापूर्वक उचलतो, असे फोटो कुठेही अडवल्यास फक्त एक कॉल करा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व होईल, असे आवाहन ऋग्वेदा फाउंडेशनचे अध्यक्ष राजू मोरे यांनी केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून दखल : गेल्या पंचवीस वर्षांपासून समाजसेवेत कार्यरत असणारे राजू मोरे यांनी गेल्या दोन वर्षापासून हा उपक्रम सुरू केला आहे. राजू मोरे यांची मुलगी ऋग्वेदा हिचे अकाली निधन झाल्यानंतर तिच्या नावानेच फाउंडेशन सुरू करून हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमाची थेट पंतप्रधान कार्यालयाने दखल घेतल्याने माझ्या कामाची मला पोचपावती मिळाली, अशी प्रतिक्रिया राजू मोरे यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधानांच्या मन की बात कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मोरे यांना मिळणार आहे.
हेही वाचा :