ETV Bharat / state

पट्टणकोडोली विठ्ठल-बिरदेव यात्रा : यंदा भरपूर पाऊस, कडधान्य महाग होणार- भाकनुक - etvbharat Maharashtra

दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल बिरदेव यात्रेतील धार्मिक विधी हे पुजारी व मानकरी यांच्या उपस्थितीत पार पडले. भाविकांच्या उपस्थितीत बिरदेवाच्या नावाने चांगभलं म्हणत आणि फरांडेबाबांचा हेडाम व भाकणुक सोहळाही यावेळी पार पडला. पुढील चारही दिवस रीतिरिवाजाप्रमाने गावात कार्यक्रम पार पडणार आहेत.

पट्टणकोडोली विठ्ठल-बिरदेव यात्रा
पट्टणकोडोली विठ्ठल-बिरदेव यात्रा
author img

By

Published : Oct 25, 2021, 7:45 PM IST

Updated : Oct 25, 2021, 8:34 PM IST

कोल्हापूर - महाराष्ट्रासह राज्यभरातील भविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कोल्हापूरातील पट्टण कोडोली येथील विठ्ठल बिरदेव यात्रेला आजपासून (सोमवार) प्रारंभ झाला. यामध्ये यंदा भरपूर पाऊस पडेल कडधान्य महाग होईल अशी भाकनुक करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही विठ्ठल बिरदेव यात्रेतील धार्मिक विधी हे पुजारी व मानकरी यांच्या उपस्थितीत पार पडले. भाविकांच्या उपस्थितीत बिरदेवाच्या नावाने चांगभलं म्हणत आणि फरांडेबाबांचा हेडाम व भाकणुक सोहळाही यावेळी पार पडला.

पट्टणकोडोली विठ्ठल-बिरदेव यात्रा

हेही वाचा-तपास यंत्रणेच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये दहशद पसरवण्याचा प्रयत्न - हसन मुश्रीफ
भंडाऱ्याची उधळण, मानाच्या तलवारीचे पूजन आणि भाकनुक

दरवर्षी मोठ्या उत्साहात पट्टणकोडोली येथील बिरदेव यात्रा पार पडत असते. मात्र, गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा रद्द करण्यात आली होती. केवळ पारंपरिक विधी पार पडले होते. मात्र, यंदा कोजक्याच लोकांच्या उपस्थितीत सोहळ्याची परवानगी मिळाली होती. त्यानुसार पारंपरिक पद्धतीने सकाळी गावचावडी येथे मानाच्या तलवारीचे पूजन पार पडले. त्यानंतर मोजकेच मानकरी फरांडे बाबा यांच्या भेटीला गेले. ढोल ताशा वाजत-गाजत भंडाऱ्याच्या उधळणीत तसेच श्री विठ्ठल-बिरदेवाच्या नावाने चांगभलंचा अखंड गजर करीत ही मिरवणूक बिरदेव मंदिरासमोरील मानाच्या दगडी गादीजवळ दुपारी आली. त्यानंतर भंडाऱ्याची, लोकर खारीक खोबऱ्याची उधळण करण्यात आली.

मंदिरातील गाभाऱ्यात हेडाम खेळत, तलवार पोटावर मारून घेत त्यांनी पारंपरिक पद्धतीने भाकणुक केली. यावेळी त्यांनी रोहिणीचा पाऊस मृगाचा पेरा होईल. तांबड धान्य (मिरची, गूळ, हरबरा) व रस भांड (ऊस) कडक होईल. कानाने ऐकाल पण डोळ्याने पाहणार नाही. माझी सेवा कराल तर मेवा खाल, सेवा करणाऱ्या कांबळ्या खाली घेईन, अशी भाकनुक केली.

हेही वाचा-लसीकरणात भारत खूप मागे, हीच गती राहिल्यास पुढचे वर्षही यातच जाणार - पृथ्वीराज चव्हाण

अजून चार दिवस गावात यात्रा

आज बिरदेव यात्रेचा पहिलाच दिवस पार पडला. फरांडे बाबांच्या भाकणुकीचा मुख्य कार्यक्रम झाला असून पुढेच चार दिवस यात्रा चालणार आहे. पुढील चारही दिवस रीतिरिवाजाप्रमाने गावात कार्यक्रम पार पडणार आहेत.

हेही वाचा-ईटीव्ही भारत विशेष : "सोनियाचा दिवस आजि अमृतें पाहिला", म्हणत कोल्हापूरातील रंगकर्मींचा आनंदोत्सव

Last Updated : Oct 25, 2021, 8:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.