कोल्हापूर - कोल्हापुरात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली असून कोरोनाची पहिली लस घेण्याचा मान आरोग्य कर्मचारी अक्षता माने यांना मिळाला आहे.नेमक्या वाढदिनी त्यांना लस मिळाल्याने सरकारकडून ही भेट असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या उपस्थितीत व आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या लसीकरणाला सुरुवात झाली. दिवसभरात जिल्ह्यात अकराशे जणांना ही लस देण्यात येणार आहे.
११ केंद्रावर १ हजार १०० जणांना देणार लस
जिल्ह्यात एकूण ११ लसीकरण केंद्र उभारण्यात आली आहेत. कोल्हापूर शहरात ६ तर ग्रामीण भागात ८ केंद्र आहेत. आज दिवसभरात अकराशे जणांना देणार लस देण्यात येणार आहे. ४२० कर्मचाऱ्यांची लसीकरणासाठी नेमणूक करण्यात आली आहे.ना
गरिकांनी न घाबरता लस घेण्यास सहकार्य करावे - आमदार ऋतुराज पाटील
नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना लसीकरण घेण्यास सहकार्य करावे, असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले.
सरकारी-खासगी डॉक्टरांना मिळणार लस
सरकारी व खासगी डॉक्टरांना लस दिली जात आहे. कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे. लसीचा पुढील ढोस २८ दिवसांनी दिला जाणार आहे, असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.
सरकारकडून वाढदिवसाची भेट मिळाली
कोरोनाची जिल्ह्यातील पहिली लस मला मिळाल्याचा अभिमान वाटतो. आज माझ्या वाढदिवसादिवशीच मिळालेली भेट आहे असे मी समजते. लसीचाचा कोणताही दुष्परिणाम दिसून येत नसल्याचे अक्षता माने यांनी सांगितले.
आशा कर्मचाऱ्यांच्या रांगा
जिल्ह्यात ११ केंद्रावर लस दिली जाणार आहे. आज कसबा बावड्यातील सर्व रुग्णालयात देखील आशा महिला कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. गेल्या दहा महिन्यांपासून सेवा दिल्याचे फलित मिळाले, असे मत त्यांनी व्यक्त केले.