ETV Bharat / state

महाराष्ट्रातले असे एक गाव जिथे आज साजरी होतेय दिवाळी - Kololi village celebrates God Diwali

कोल्हापूर जिल्ह्यातील कोलोली गावात वर्षानुवर्षे देव दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी गावात यात्रा भरते.

one-such-village-in-maharashtra-where-diwali-is-celebrated-today
कोल्हापूरातील कोलोली साजरी होते देव दिवाळी
author img

By

Published : Nov 27, 2019, 8:27 PM IST

Updated : Nov 27, 2019, 11:50 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यात असे एक गाव आहे. ज्या गावात वर्षानुवर्षे दिवाळीच साजरी होत नाही. हो हे खरं आहे. पन्हाळा तालुक्यातील कोलोली असे या गावचे नाव असून गेल्या अनेक वर्षांपासून गावात दिवाळी ऐवजी एका महिन्यानंतर देव दीपावली साजरी करतात.

हे आहे पन्हाळा तालुक्यातील कोलोली एक छोटे गाव. गावात गाडाईदेवीचे एक जागृत देवस्थान आहे. आजपासून पुढचे दोन दिवस याठिकाणी गाडाईदेवीच्या यात्रेला म्हणजेच देव दीपावलीला सुरुवात झाली आहे. या दिवाळीला धाकटी दिवाळी सुध्दा म्हंटले जाते. खरंतर गाडईदेवी महिषासूर मर्दिनीचा अवतार असून सुवासिनींची पाठराखण म्हणून सुद्धा या देवीला ओळखले जाते. त्यामुळे याच यात्रेच्या दिवशी इथले ग्रामस्थ दिवाळी साजरी करतात. विशेष म्हणजे सर्वच सुवासिनी या दिवाळीनिमित्त कोलोली गावाला येत असतात.

कोल्हापुरातील कोलोली साजरी होते देव दिवाळी

महिन्याभरापूर्वी देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. पण या कोलोली गावात आजपर्यंत कधीही दिवाळी साजरी झाली नाहीये. दिवाळीनंतर एक महिन्यांनी येणाऱ्या अमावस्येला मात्र गावात एक यात्रा साजरी होते. या यात्रेला देव दीपावली असे इथले नागरिक म्हणतात. या दिवशी दिवाळीपेक्षाही आनंदात आणि उत्साहात ही देव दीपावली इथले ग्रामस्थ साजरी करतात.

या देव दीपावलीनिमित्त गावात तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबरच गावात मोठी जत्राही भरते. लहान मुलांसाठी पाळणे, खेळण्यांची, खाऊची दुकाने अगदी खचाखच भारतात. गावातील अनेकजण गावाबाहेर नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत. मात्र, देव दीपावली म्हणजेच गाडाईदेवीच्या यात्रेला हे सर्व जण गावात येतात. गेल्या अनेक वर्षांपासून गावामध्ये अशा प्रकारे कोलोली गावात देव दीपावली साजरी करत असून. दीपावलीनंतर 1 महिन्यांनी दिवाळी साजरी करण्याची परंपरा गावानं जपली आहे.

Intro:अँकर : महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यात असं एक गाव आहे ज्या गावात वर्षानुवर्षे दिवाळीच साजरी होत नाहीये. हो हे खरं आहे. पन्हाळा तालुक्यातील कोलोली असं या गावच नाव असून गेल्या अनेक वर्षांपासून गावात दिवाळी ऐवजी एका महिन्यानंतर देव दीपावली साजरी करतात. पाहुयात यावरचा हा खास रिपोर्ट...Body:व्हीओ 1 : हे आहे पन्हाळा तालुक्यातील कोलोली एक छोटंसं गाव. गावात गाडाईदेवीचं एक जागृत देवस्थान आहे. आजपासून पुढचे दोन दिवस याठिकाणी गाडाईदेवीच्या यात्रेला म्हणजेच देव दीपावलीला सुरुवात झालीये. या दिवाळीला धाकटी दिवाळी सुदधा म्हंटल जातं. खरंतर गाडईदेवी महिषासूर मर्दिनीचा अवतार असून सुवासिनींची पाठराखण म्हणून सुद्धा या देवीला ओळखले जाते. त्यामुळे याच यात्रेच्या दिवशी इथले ग्रामस्थ दिवाळी साजरी करतात. विशेष म्हणजे सर्वच सुवासिनी या दिवाळीनिमित्त कोलोली गावाला येत असतात.

बाईट : मंगल पाटील, ग्रामस्थ कोलोली

व्हीओ 2 : महिन्याभरापूर्वी देशभरात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. पण या कोलोली गावात आजपर्यंत कधीही दिवाळी साजरी झाली नाहीये. दिवाळीनंतर एक महिन्यांनी येणाऱ्या आमवस्याला मात्र गावात एक यात्रा साजरी होते, या यात्रेला देव दीपावली असं इथले नागरिक म्हणतात. या दिवशी दिवाळीपेक्षाही आनंदात आणि उत्साहात ही देव दीपावली इथले ग्रामस्थ साजरी करतात.

बाईट 1 : मयुरा जाधव, ग्रामस्थ कोलोली
बाईट 2 : सदाशिव पाटील, ग्रामस्थ कोलोली

व्हीओ 3 : या देव दीपावलीनिमित्त गावात तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मनोरंजनाच्या कार्यक्रमाबरोबरच गावात मोठी जत्राही भरते, लहान मुलांसाठी पाळणे, खेळण्यांची, खाऊची दुकानं अगदी खचाखच भारतात. गावातील अनेकजण गावाबाहेर नोकरीनिमित्त स्थायिक झाले आहेत पण देव दीपावली म्हणजेच गाडाईदेवीच्या यात्रेला मात्र न चुकता येत असतात.

बाईट : प्रकाश सावंत, ग्रामस्थ कोलोली

व्हीओ 4 : गेल्या अनेक वर्षांपासून गावामध्ये अशा प्रकारे कोलोली गावात देव दीपावली साजरी करत असून. दीपावलीनंतर 1 महिन्यांनी दिवाळी साजरी करण्याची परंपरा गावानं जपली आहे...Conclusion:.
Last Updated : Nov 27, 2019, 11:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.