ETV Bharat / state

'नो शेव्ह नोव्हेंबर' मोहिमेला कोल्हापुरात तरुणांचा मोठा प्रतिसाद - कोल्हापुरात नो शेव्ह नोव्हेंबर मोहीम

कोल्हापुरातले काही तरुण एका मोहिमेसाठी दाढी वाढवत आहेत. 'नो शेव्ह नोव्हेंबर' असे या मोहिमेचे नाव असून कर्करोगग्रस्त रुग्णांबद्दल सहानुभूती व्यक्त करणारी ही मोहीम कोल्हापूरमध्ये सुद्धा सुरू झाली आहे.

नो शेव्ह नोव्हेंबर
author img

By

Published : Nov 17, 2019, 3:25 PM IST

Updated : Nov 17, 2019, 6:56 PM IST

कोल्हापूर - नोव्हेंबर महिना आला की तरुण मुलं एक फॅशन म्हणून दाढी वाढविताना सर्रास पाहायला मिळतात. पण कोल्हापुरातले काही तरुण एका मोहिमेसाठी दाढी वाढवत आहेत. 'नो शेव्ह नोव्हेंबर' असे या मोहिमेचे नाव असून कर्करोगग्रस्त रुग्णांबद्दल सहानुभूती व्यक्त करणारी ही मोहीम कोल्हापूरमध्ये सुद्धा सुरू झाली आहे. या वर्षी या मोहिमेचे दुसरे वर्ष आहे. गतवर्षी या मोहिमेत दोनशेहून अधिक तरुणांचा सहभाग होता. पण यावर्षी या मोहिमेने कोल्हापुरात एका मोठ्या चळवळीचेच रुप धारण केल्याचे पाहायला मिळत आहे.

'नो शेव्ह नोव्हेंबर' मोहिमेला कोल्हापुरात तरुणांचा मोठा प्रतिसाद

हेही वाचा - शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर करा : आमदार चंद्रकांत जाधव

'नो शेव्ह नोव्हेंबर' ही मोहीम सर्वात अगोदर ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहरात १९९९ मध्ये काही तरुणांनी एकत्र येऊन सुरू केली. या मोहिमेला जगभरातून अनेक तरुणांनी प्रतिसाद दिला. याचेच अनुकरण कोल्हापुरातील दर्शन शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करायचे ठरविले. त्यानुसार त्यांनी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून तरुणांना जोडण्याचे काम सुरू केले. त्यांच्या या मोहिमेला कोल्हापुरातील दोनशेहून अधिक तरुणांनी पाठिंबा दिला. याअंतर्गत महिनाभर दाढी केली जात नाही. त्यासाठी येणारा खर्च वाचवून त्याची रक्कम जमा करून कर्करोगग्रस्त रुग्णांना उपचारासाठी द्यायची, या उद्देशाने ही मोहीम हाती घेतली आहे.

यंदा या मोहिमेचे दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी मोहिमेत तरुणांचा दुपटीने सहभाग पाहायला मिळत आहे. जवळपास 400 हुन अधिक तरुण मोहिमेत सक्रिय झाले असून ग्रुपद्वारे हजारो रुपयांची मदत सोशल मीडियाच्या माध्यमातून गोळा केली जात आहे. यावर्षी जवळपास 6 ते 7 कर्करोगींना जमा झालेली मदत दिली जाणार आहे.

हेही वाचा - कोल्हापुरात व्हॉट्सअप ग्रुपचे शटर बंद; अ‌ॅडमिनने घेतली काळजी

या मोहिमेबाबत माहिती मिळाल्यानंतर दर्शन शहा आणि शेखर पाटील यांनी हा विचार त्यांच्या मित्रमंडळींना बोलून दाखवला. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कर्करोगाचे हजारो रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी आपण ही मोहीम सुरू करू, असा निर्णय सर्वांनी केला. त्यानुसार यंदा सलग दुसऱ्या वर्षी ही मोहीम अगदी उत्साहाने सर्व तरुण मिळून करत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मोहीम सुरू झाली असल्याने सोशल मीडियाचा असाही वापर करणारे तरुण आपल्या आजू बाजूला वावरतात हेही विशेष.

कर्करोगग्रस्तांच्या वेदना वाटून घेता येत नसल्या तरी त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करता येऊ शकते. हा विचार घेऊन ही मोहीम कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या जोमाने पार पडत आहे. जमा होणारी रक्कम १ डिसेंबर रोजी कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे.

Intro:अँकर : नोव्हेंबर महिना आला की तरुण मुलं एक फॅशन म्हणून दाढी वाढविताना सर्रास पाहायला मिळतात. पण कोल्हापुरातले काही तरुण एका मोहिमेसाठी दाढी वाढवतायेत. नो शेव्ह नोव्हेंबर असं या मोहिमेचं नाव असून कॅन्सरग्रस्त रुग्णांबद्दल सहानुभूती व्यक्त करणारी ही मोहीम कोल्हापूरमध्ये सुद्धा सुरूये. या वर्षी या मोहिमेचं दुसरं वर्ष आहे. गतवर्षी या मोहीमेत दोनशेहून अधिक युवकांचा सहभाग होता. पण यावर्षी या मोहिमेने कोल्हापूरात एका मोठ्या चळवळीचेच रूप धारण केल्याचं पाहायला मिळतंय. पाहुयात काय आहे ही नेमकी मोहीम..Body:व्हीओ 1 : 'नो शेव्ह नोव्हेंबर' ही मोहीम सर्वात पहिला ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहरात १९९९ मध्ये काही तरुणांनी एकत्र येऊन सुरू केली. या मोहिमेला जगभरातून अनेक युवकांनी प्रतिसाद दिला. याचेच अनुकरण कोल्हापुरातील दर्शन शहा आणि शेखर पाटील यांनी करायचे ठरविले. त्यानुसार त्यांनी व्हाट्सअँप ग्रुपच्या माध्यमातून युवकांना जोडण्याचे काम सुरू केले. त्यांच्या या मोहिमेला कोल्हापुरातील दोनशेहून अधिक तरुणांनी पाठिंबा दिला. याअंतर्गत महिनाभर दाढी केली जात नाही. त्यासाठी येणारा खर्च वाचवून त्याची रक्कम जमा करून कॅन्सरग्रस्त रुग्णांना उपचारासाठी द्यायची या उद्देशाने ही मोहीम हाती घेतली असल्याचे ग्रुपचे सदस्य सांगतात.

बाईट - तेजस जाधव, ग्रुप सदस्य

व्हीओ 2 : यंदा या मोहिमेचे दुसरं वर्षे आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी मोहीमेत तरुणांचा दुपटीने सहभाग पाहायला मिळतोय. जवळपास 400 हुन अधिक तरुण मोहिमेत सक्रिय झाले असून ग्रुपच्या माध्यमातून हजारो रुपयांची मदत सोशल मीडियाच्या माध्यमातून गोळा केली जात आहे. यावर्षी जवळपास 6 ते 7 कन्सरग्रस्त रुग्णांना जमा झालेली मदत दिली जाणार आहे.

बाईट - पंकज माने, ग्रुप सदस्य

व्हीओ 3 - या मोहिमेबाबत माहिती मिळाल्यानंतर दर्शन शहा आणि शेखर पाटील यांनी हा विचार त्याच्या मित्रमंडळींना बोलून दाखवला. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात कर्करोगाचे हजारो रुग्ण आहेत. त्यांच्यासाठी आपण ही मोहीम सुरू करू असा निर्णय सर्वांनी केला त्यानुसार यंदा सलग दुसऱ्या वर्षी ही मोहीम अगदी उत्साहाने सर्व तरुण मिळून राबवत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून ही मोहीम सुरू झाली असल्याने सोशल मीडियाचा असाही वापर करणारे तरुण आपल्या आजू बाजूला वावरतात हेही विशेष.

बाईट - हर्षल सुर्वे, ग्रुप सदस्य

व्हीओ 4 : कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या वेदना वाटून घेता येत नसल्या तरी त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करता येऊ शकते. हा विचार घेऊन ही मोहीम कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या जोमाने पार पडत आहे. जमा होणारी रक्कम १ डिसेंबर रोजी कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.Conclusion:.
Last Updated : Nov 17, 2019, 6:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.