ETV Bharat / state

कोल्हापुरात ऑक्सिजन तुटवडा नाही; सात ठिकाणी गडहिंग्लज पॅटर्न प्रकल्प नियोजित- जिल्हाधिकारी

author img

By

Published : Apr 25, 2021, 9:00 AM IST

जिल्ह्यात 'कोल्हापूर ऑक्सिजन'कडून 25 मेट्रिक टन, बेल्लारी येथून 12 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन, आणि जिल्ह्यातील इतर प्रमुख रिफिलरकडून वायुरूपात ऑक्सिजनचा पुरवठा सुरु आहे. याशिवाय पुणे येथील आयनॉक्स, तायो निप्पोन या मोठ्या कंपन्यांकडूनही लिक्विड ऑक्सिजनचा थेट पुरवठा होतोय, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

कोल्हापुरात ऑक्सिजन तुटवडा नाही
कोल्हापुरात ऑक्सिजन तुटवडा नाही

कोल्हापूर - जिल्ह्यात अनेक ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा नाही. पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील सर्व जिल्ह्यांना ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी पुणे येथे अधिकाऱ्यांची टीम पूर्ण वेळ कार्यरत आहे. तसेच जिल्ह्यात पुढील काळात ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी, गडहिंग्लजमधल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवर सात ठिकाणी नव्याने ऑक्सिजन जनरेटर आणि वायू रुपात ऑक्सिजन सिलेंडर मध्ये भरण्याचे प्रकल्प नियोजित असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांच्या सुचनेनुसार प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी म्हंटले आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते.

जिल्ह्यात या ठिकाणाहून ऑक्सिजनचा पुरवठा सुरू -

सध्या जिल्ह्यात 'कोल्हापूर ऑक्सिजन'कडून 25 मेट्रिक टन, बेल्लारी येथून 12 मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन, आणि जिल्ह्यातील इतर प्रमुख रिफिलरकडून वायुरूपात ऑक्सिजनचा पुरवठा सुरु आहे. याशिवाय पुणे येथील आयनॉक्स, तायो निप्पोन या मोठ्या कंपन्यांकडूनही लिक्विड ऑक्सिजनचा थेट पुरवठा होतोय, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

कोल्हापूर येथील कोल्हापूर ऑक्सिजन, जे एस डब्ल्यू बेल्लारी आणि पुणे येथील आयोनोक्स, तायो निप्पाॕन आणि एअर लिक्विड या कंपन्यांकडून तसेच जिल्ह्यातील इतर रिफिलरकडून पुरवठादार ऑक्सिजन दररोज उचलून शासकीय व खासगी कोव्हीड रुगणालयांना पुरवत आहेत. यासाठी खास अधिकाऱ्यांची नेमणूकही केली आहे. यावर अपर जिल्हाधिकारी किशोर पवार आणि निवासी उपजिल्हाधिकारी गलंडे यांच्या नियंत्रणाखालील जिल्हा समिती पूर्णवेळ कार्यरत आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हंटले आहे.

बेल्लारी येथून प्राणवायूचा पुरवठा सुरळीत मिळण्यासाठी हेमंत निकम हे उपजिल्हाधिकारी पूर्ण वेळ बेल्लारी येथे नेमण्यात आलेले आहेत व प्रत्येक टँकर सोबत एक स्वतंत्र पोलीस एस्कॉर्ट पुरवण्यात आलेले आहे. त्यामुळे प्राणवायूची वाहतूक जलद होण्यास मदत होणार आहे.

गडहिंग्लजच्या धर्तीवर सात ठिकाणी ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प -

भविष्यातही ऑक्सिजनमध्ये कमतरता भासू नये यासाठी गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या धर्तीवर जिल्ह्यात सात ठिकाणी ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प सिलेंडर्स भरण्याच्या सुविधेसहित अस्थापित करण्यात येणार आहेत. त्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील कोव्हीड काळजी केंद्र, समर्पित कोव्हीड आरोग्य केंद्र, समर्पित कोव्हीड रुग्णालयांसाठी आणि अत्यावश्यक प्रसंगी वापरासाठी १० लिटर क्षमतेचे अतिरिक्त ३०० ऑक्सिजन काॕन्संट्रेटर खरेदी करण्यात येत आहेत, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.