कोल्हापूर - गेल्या 2 वर्षांपासून संपूर्ण जग ज्या कोरोनाचा सामना करत आहे. तोच कोरोना कोल्हापुरातून हद्दपार झाला आहे. आज (बुधवार) आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात एकही नवा रुग्ण आढळला ( Kolhapur Corona Free ) नसून एकही सक्रिय रुग्ण सध्या नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. गेल्या 2 महिन्यांपासून कोरोना रुग्ण 20 ते 40 च्या आसपास होते. मात्र आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकही रुग्ण सध्या उरला नाही. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आजपर्यंतच्या एकूण आकडेवारीचा आढावा.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर : कोल्हापूर जिल्ह्यात आज 20 एप्रिल 2022 पर्यंत एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 20 हजार 346 इतकी झाली आहे. त्यातील 2 लाख 14 हजार 435 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 5 हजार 911 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या शून्य झाली असून एकही नवा रुग्ण जिल्ह्यात आढळला नाही. ही समाधानाची बाब आहे. यापुढे सुद्धा नवीन रुग्ण आढळू नये, अशी सर्वजण अपेक्षा करत आहेत.
वयोगटानुसार आजपर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :
1 वर्षाखालील - 358 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 7945 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 18509 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 126556 रुग्ण
51 ते 70 वर्ष - 52931 रुग्ण
71 वर्षांवरील - 14047 रुग्ण, जिल्ह्यात असे एकूण 2 लाख 20 हजार 346 रुग्ण झाले आहेत.
तालुक्यानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे :
1) आजरा - 5622
2) भुदरगड - 5242
3) चंदगड - 4017
4) गडहिंग्लज - 7982
5) गगनबावडा - 764
6) हातकणंगले - 24375
7) कागल - 8272
8) करवीर - 33162
9) पन्हाळा - 11285
10) राधानगरी - 5286
11) शाहूवाडी - 5479
12) शिरोळ - 14251
13) कोल्हापुर महानगरपालिका - 60818
14) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - इचलकरंजी- 12847, जयसिंगपूर- 3061, कुरुंदवाड-569, गडहिंग्लज-1588, कागल-2111, शिरोळ-698, हुपरी-1433, पेठवडगाव-1138, मलकापूर- 66, मुरगुड-642
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 9618
जिल्ह्यातील आजपर्यंतच्या मृत्यूची आकडेवारी पुढीलप्रमाणे : कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत 5 हजार 911 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यापैकी 618 कोल्हापूर जिल्ह्याबाहेरचे रुग्ण होते.
विभागानुसार आकडेवारी पुढीलप्रमाणे :
1) कोल्हापूर ग्रामीण विभागातील - 3150 रुग्णांचा मृत्यू
2) नगरपालिका विभागातील - 847 रुग्णांचा मृत्यू
3) कोल्हापूर महानगरपालिका विभागातील - 1296 रुग्णांचा मृत्यू
4) इतर जिल्ह्यातील तसेच राज्यातील - 618 रुग्णांचा मृत्यू
हेही वाचा - Exam Fever 2022 : बिहारमधील एकाच गावात घडले 150 आयआयटीयन्स; यशस्वी विद्यार्थीच देतात मोफत शिक्षण