कोल्हापूर - कोल्हापूरात बुधवारी सकाळपासून आणखी 9 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दिवसभरात आणखी 7 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सकाळपासून एकूण 109 जणांच्या स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 99 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. यातील 2 स्वॅब नाकारण्यात आले आहेत.
बुधवारी रात्री 9 वाजता प्राप्त अहवालानुसार एकूण 759 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 710 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत कोल्हापूरातील 41 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक बी. सी. केम्पी पाटील यांनी दिली. दरम्यान, कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू असलेल्या कोल्हापूरात कालपासून आणखी रुग्ण वाढू लागले असल्याने चिंता वाढली आहे.
बुधवारी आढळलेले 9 रुग्ण पुढीलप्रमाणे -
गडहिंग्लज तालुक्यातील 1 रुग्ण
हातकणंगले तालुक्यातील 2 रुग्ण
करवीर तालुक्यातील 2 रुग्ण
इचलकरंजी शहरातील 2 रुग्ण
कोल्हापूर शहरातील 2 रुग्ण