ETV Bharat / state

ठरलं! धनंजय महाडिक भाजपमध्ये जाणार; ५ दिवसात करणार प्रवेश

गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय महाडिक भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या सोलापूरमधील ३१ ऑगस्टच्या कार्यक्रमात महाडिक प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, मोदी यांचा दौरा अद्याप निश्चित नाही. तरीही महाडिक येत्या ५ दिवसात भाजप प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक
author img

By

Published : Aug 27, 2019, 12:22 PM IST

Updated : Aug 27, 2019, 2:04 PM IST

कोल्हापूर - गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांचे भाजप प्रवेश सुरू आहेत. आता कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे काही प्रमुख कार्यकर्ते देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून धनंजय महाडिक भाजप प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या सोलापूरमधील ३१ ऑगस्टच्या कार्यक्रमात महाडिक प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, मोदी यांचा दौरा निश्चित नाही. तरीही महाडिक येत्या ५ दिवसात भाजप प्रवेश करणार आहेत.

भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील जवळपास 50 प्रमुख कार्यकर्ते महाडिक यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे काही प्रमुख कार्यकर्ते, ताराराणी आघाडीचे नगरसेवक, जिल्हापरिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य त्याचबरोबर गोकुळ दूध संस्थेचे आणि कारखान्याचे संचालक यांच्यासह कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

महाडिक यांच्या भाजपप्रवेशानंतर जिल्ह्यातील भाजपची ताकद नक्कीच वाढणार आहे. धनंजय महाडिक हे सध्या मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ते मुंबईला गेले आहेत. त्यांच्या भेटीनंतर या प्रवेशाची तारीख निश्चित करण्यात येणार आहे.

Intro:अँकर : काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेत्यांच्या भाजप प्रवेशाचा सिलसिला काही केल्या थांबत नाहीये.. कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करणार हे निश्चित झालं आहे. याबाबतच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सुरू होत्या. येत्या 31 ऑगस्टला नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सोलापूरमधील होणाऱ्या एका भव्य कार्यक्रमात ते भाजप प्रवेश करणार आहेत अशी माहिती समजली होती. नरेंद्र मोदी यांचा दौरा अद्यापही निश्चित नाहीये पण धनंजय महाडिक यांचा येत्या 5 दिवसांत भाजपप्रवेश निश्चित झाला आहे. भाजपप्रवेशानंतर जिल्ह्यातील जवळपास 50 प्रमुख लोकं सुद्धा महाडिक यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे काही प्रमुख कार्यकर्ते, ताराराणी आघाडीचे नगरसेवक, जिल्हापरिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य त्याचबरोबर गोकुळ दूध संस्थेचे आणि कारखान्याचे संचालक यांच्यासह कार्यकर्ते सुद्धा गणेशउत्सवानंतर भव्य कार्यक्रमात प्रवेश करणार आहेत. महाडिक यांच्या भाजपप्रवेशानंतर जिल्ह्यातील भाजपची ताकद नक्कीच वाढणार आहे. धनंजय महाडिक हे सध्या मुंबई मध्ये तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ते मुंबईला गेले असून त्यांच्या भेटीनंतर या प्रवेशाची तारीख निश्चित करण्यात येणार आहे.Body:.Conclusion:.
Last Updated : Aug 27, 2019, 2:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.