कोल्हापूर - कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर उभे करून गोळ्या घाला, असे वादग्रस्त विधान कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केले आहे. या वक्तव्याचा सीमा लढ्यातील नेते प्राध्यापक एन. डी. पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे. भीमाशंकर यांच्यासारख्या लोकांच्या वक्तव्याने चळवळ थांबणार नसल्याची प्रतिक्रिया एन. डी. पाटील यांनी दिली.
हेही वाचा - 'त्या' नेत्यांनाही सीमेवर गोळ्या घाला, 'कर्नाटक नवनिर्माण सेना' अध्यक्षाचे वादग्रस्त विधान
हे महाशय कोण आहेत? त्यांचे नाव मी पहिल्यांदाच ऐकले आहे. भीमाशंकर सारख्या लोकांच्या वक्तव्यांनी सीमाप्रश्नी चळवळ कधीच थांबणार नाही. सीमाप्रश्नाचा निकाल अजून लागायचा आहे. त्याआधीच अशी वक्तव्ये करणे शोभणारी नसल्याचे मत एन. डी. पाटील यांनी नोंदवले आहे.