ETV Bharat / state

मटणाचा दर २० रुपयांनी केला कमी; ५४० रुपयेवर विक्रेते ठाम - Vijay Kamble khatik community organization Kolhapur

गेल्या महिन्याभरापासून कोल्हापूरात ५६० रुपये प्रतिकिलो असलेल्या मटणाच्या दरात २० रुपये कमी करत असून ५४० हा आमचा अंतिम दर असणार असल्याचे उत्तर खाटीक समाज संघटनेचे विजय कांबळे यांनी स्पष्ट केले आहे.

kolhapur
विजय कांबळे
author img

By

Published : Dec 5, 2019, 12:57 PM IST

कोल्हापूर- गेल्या काही दिवसांपासून मटण दरवाढीवरून अनेक तक्रारी येत आहेत. पण, मटणाच्या दरवाढीमागे व्यवसायाच्या पलीकडे जाऊन आमच्या काही अडचणी असल्याचे अजब उत्तर खाटीक समाज संघटनेचे विजय कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिले. गेल्या महिन्याभरापासून कोल्हापुरात ५६० रुपये प्रतिकिलो असलेल्या मटणाच्या दरात २० रुपये कमी करत असून ५४० हा आमचा अंतिम दर असणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

माहिती देताना उत्तर खाटीक समाज संघटनेचे विजय कांबळे

कोल्हापूरपासून ४ किलोमीटरवर असणाऱ्या गावांमध्ये जर ४४० रुपये किलो मटण विक्री होत असेल, तर कोल्हापुरात यामध्ये सव्वाशे रुपयांचा फरक का? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता खाटीक समाजाचे नेते विजय कांबळे म्हणाले, आमच्या मटणाचा दर्जा आणि इतर ठिकाणचा दर्जा यात फरक आहे. मटणातील शुद्धता हाच आमचा प्रामाणिकपणा आहे. दरम्यान, मटण दरासंदर्भात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी एका समितीची नियुक्ती केली आहे. याबाबत विचारले असता कांबळे म्हणाले, मटण दराबाबत नागरी कृती समितीची बैठक झाली. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली, त्यामध्ये समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला.

समितीमध्ये मटण विक्रेते प्रतिनिधी, नागरिक कृती समितीचे प्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांचा समावेश आहे. या समितीमार्फत शहर आणि शहराबाहेरचे मटण दर, बकऱ्यांची खरेदी, मटणाचा दर्जा आदी बाबींचा अभ्यास करण्यात येणार आहे. परंतु, शहराबाहेर मटण विक्री व्यवसाय करणारे आमचे बांधव असून ते त्यांच्या पद्धतीनुसार व्यवसाय करतात. त्यांचा व्यवसाय उघड करणे आम्हाला एक व्यवसायिक बांधव म्हणून मान्य नाही. म्हणून आम्ही समितीमध्ये सहभागी होणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करून पडताळणी करावी. समिती जे मुद्दे उपस्थित करेल त्याची आम्ही उत्तरे देऊ, असेही विजय कांबळे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान, समितीच्या बैठकीला खाटीक समाजाचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. त्यामुळे, आता समिती कोणता दर निश्चित करते. आणि त्यावर खाटीक समाजाचे काय उत्तर असणार यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा- 'शिवाजी विद्यापीठा'चे नामकरण 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असे करा - संभाजीराजे

Intro:अँकर : गेल्या काही दिवसांपासून मटण दरवाढीवरून अनेक तक्रारी येत आहेत. पण मटणाची दरवाढीमागे व्यवसायाच्या पलीकडे जाऊन आमच्या काही अडचणी असल्याचे अजब उत्तर खाटीक समाज संघटनेचे विजय कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिले. गेल्या महिन्याभरापासून कोल्हापूरात 560 रुपये प्रतिकिलो असलेल्या मटणाच्या दरात 20 रुपये कमी करत असून 540 हा आमचा अंतिम दर असणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. Body:व्हीओ 1: यावेळी कोल्हापूरपासून 4 किलोमीटरवर असणाऱ्या गावांमध्ये जर 440 रुपये किलो मटण विक्री होत असेल तर कोल्हापूरात यामध्ये सव्वाशे रुपयांचा फरक का? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता खाटीक समाजाचे नेते विजय कांबळे म्हणाले, आमच्या मटणाचा दर्जा आणि इतर ठिकाणचा दर्जा यात फरक आहे. मटनातील शुध्दता हाच आमचा प्रामाणिकपणा आहे. दरम्यान, मटन दरासंदर्भात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी एका समितीची नियुक्ती केली आहे. याबाबत विचारले असता कांबळे म्हणाले, मटन दराबाबत नागरी कृती समितीची बैठक झाली. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली, त्यामध्ये समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. समितीमध्ये मटण विक्रेते प्रतिनिधी, नागरिक कृती समितीचे प्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी यांचा समावेश आहे. या समितीमार्फत शहर आणि शहराबाहेर चे मटण दर बकऱ्यांची खरेदी मटणाचा दर्जा आदी बाबींचा अभ्यास करण्यात येणार आहे. परंतु शहराबाहेर मटण विक्री व्यवसाय करणारे आमचे बांधव असून ते त्यांच्या पद्धतीनुसार व्यवसाय करतात. त्यांचा व्यवसाय उघड करणे आम्हाला एक व्यवसायिक बांधव म्हणून मान्य नाही, म्हणून आम्ही समितीमध्ये सहभागी होणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांची समिती नियुक्ती करून पडताळणी करावी. समिती जे मुद्दे उपस्थित करेल त्याची आम्ही उत्तरं देऊ असेही विजय कांबळे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान समितीच्या बैठकीला खाटीक समाजाचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते त्यामुळे आता समिती कोणता दर निश्चित करते आणि त्यावर खाटीक समाजाचे काय उत्तर असणार यावर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे..Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.