ETV Bharat / state

MLA Satej Patil : सतेज पाटील यांची महागाईवरून भाजपावर टीका, म्हणाले... - Satej Patil Criticism On Bjp

MLA Satej Patil : कोल्हापूरमधील जनसंवाद यात्रेत आमदार सतेज पाटील यांनी भाजपा व युती सरकारवर तीव्र शब्दात टीका केली. गॅसचे दर दोनशे रुपये कमी केल्याची टिमकी वाजवणाऱ्यांनी गेल्या काही वर्षात चारशे रुपयांना असणारा गॅस हा अकराशे रुपयांवर नेऊन ठेवला आहे. येत्या काळात निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकार आणखी दर कमी करेल, असे सतेज पाटील म्हणाले.

Satej Patil
आमदार सतेज पाटील
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 7:59 AM IST

माहिती देताना आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : MLA Satej Patil : डोक्यावर पाऊस, हलगीचा दणदणाट, कार्यकर्त्यांची साथ आणि फुलांच्या वर्षाव अशा उत्साहाच्या वातावरणात काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा (Jan Samvad Padyatra) शनिवारी कोल्हापुरात आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी भाजपा व युती सरकारवर तीव्र शब्दात टीका केली. तर जाती-जातींमध्ये भांडण लावून भाजपा राजकारण करत आहे, असे म्हणत राज्य सरकार व केंद्र सरकारवर त्यांनी (Satej Patil On BJP) जोरदार टीका केली.

सरकारवर केली जोरदार टीका : दसरा चौकातील सभेत आमदार सतेज पाटील यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सध्याच्या वातावरणात सर्वसामान्यांना सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून काँग्रेसचा आधार वाटतो. स्वातंत्र्यापासून आम्ही जो बंधु भाव जोपासला होता, तो सत्तेत बसलेला पक्ष कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. हे देशाच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar ) यांनी लिहिलेली घटना आपल्याला वाचवायची असेल तर भविष्यात आपल्याला या पुरोगामी विचारांची भूमिका घेऊन पुढे जावे लागेल.

येणारे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष : कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचारांचा आणि शाहू महाराजांचा विचारांचा आहे. येणारे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असणार आहे. आणखी काही फटाकडे वाजवण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने होतील. मात्र आपल्याला दक्ष रहावे लागेल. केंद्र सरकार म्हणत आहे हा अमृतकाळ सुरू आहे. मात्र अमृत हे केवळ दोन लोकांच्या म्हणजे अडाणी आणि अंबानी नशिबी आले आहे. काळ हा 120 कोटी जनतेच्या नशिबी आला आहे. तसेच गेल्या 9 वर्षांत नथुराम गोडसे यांचा उदो उदो करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केली जात आहे. जुना इतिहास पासून नवीन इतिहास दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप, सतेज पाटील यांनी केला आहे.

गेल्या नऊ वर्षात महागाईने सर्वसामान्यांची कंबरडं मोडले आहे. रक्षाबंधनला दोनशे रुपये गॅस सिलेंडरचे दर कमी झाले. मात्र येत्या काळात इंडिया आघाडीची जशी बैठका होतील त्यानुसार सत्ताधाऱ्यांकडून आणखी महागाई कमी करण्यात येईल. कारण भाजपाला 2024 ची निवडणूक ही महत्त्वाची असून त्याला अनुसरून काम भाजप करत आहे - सतेज पाटील, आमदार

जनसंवाद यात्रा कोल्हापूर शहरात : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांनी भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) काढली. याच धरतीवर महाराष्ट्रात काँग्रेसने जनसंवाद यात्रा ( Jan Samvad Padyatra ) काढण्यास सुरुवात केली. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात जनसंवाद पदयात्रा काढले जात आहे. (Satej Patil Jan Samvad Padayatra ) ही पदयात्रा विविध तालुक्यातून कोल्हापूर शहरात दाखल झाली. यावेळी डोक्यावर पाऊस, हलगीचा दणदणाट, ढोल ताशाचा गजर, ठिकठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून होत असलेली फुलांची उधळण आणि महिलांकडून प्रत्येक चौकात सतेज पाटील यांचे होत असलेले औक्षण असा उत्साह पदयात्रेत पाहायला मिळाला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून (sharad Pawar Group) आणि शिवसेना ठाकरे गटाकडून या यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.

हेही वाचा -

  1. Loksabha Election 2024 : लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा 'Formula' ठरला? सतेज पाटील म्हणाले...
  2. MLA Satej Patil demand : गोकुळचे लेखापरीक्षण केवळ सध्याचेच का ? गेल्या पंचवीस वर्षापासूनचे करा, सतेज पाटील यांची मागणी
  3. Satej Patil: चंद्रकांत खैरे यांनी कॉंग्रेसच्या आमदारांबाबत केलेले वक्तव्य मागे घ्यावे - सतेज पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.