कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीच्या युतीच्या प्रचाराचा नारळ आज कोल्हापूरमध्ये फुटला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित होते. यावेळी आरपीयआचे अध्यक्ष खासदार रामदास आठवलेंनी आपल्या नेहमीच्या शैलीत कवितेच्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकली. 'आता भाजप आणि शिवसनेचा जमलेला आहे सुर, म्हणून भरून आलेलं आहे माझं उर'. 'देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची चांगलीच जमली आहे जोडी, पण माझ्याकडे कुठे आहे लोकसभेची गाडी'. असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला. त्यांनी आपल्या कवितेतून युतीवर स्तुतीसुमनेही उधळली.
युतीच्या प्रचाराचा नारळ आज कोल्हापूरमध्ये फुटला. यावेळी मुख्यमंत्र्यांसह, उद्धव ठाकरे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांच्यासह सेना भाजपचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी रामदास आठवले यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून उपस्थितांची मने जिंकत युतीला मतदान करण्याचे आवाहन केले.
काय म्हणाले रामदास आठवले
'घ्या तुम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आण, आणि निवडून द्या कमळ आणि धनुष्यबाण'.
'आम्ही तर वाढवणार आहोत भारताची शान पण तुम्हाला द्याव नरेंद्र लागेल नरेंद्र मोदींकडे ध्यान'.