ETV Bharat / state

Shahu Maharajs birth anniversary : राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा गौरव जगापर्यंत पोहोचवला पाहिजे - दीपक केसरकर

कोल्हापुरात छत्रपती राजश्री शाहू महाराजांची 149 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लक्ष्मी विलास पॅलेस येथे छत्रपती राजश्री शाहू महाराजांची जयंती साजरी केली. महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी लक्ष्मी विलास पॅलेस येथे अनेक कोल्हापूरकर अभिवादन करण्यासाठी आले होते.

Shahu Maharajs birth anniversary
पालकमंत्री दीपक केसरकर
author img

By

Published : Jun 26, 2023, 2:26 PM IST

Updated : Jun 26, 2023, 7:32 PM IST

माहिती देताना दीपक केसरकर

कोल्हापूर: आज छत्रपती राजश्री शाहू महाराजांची 149 वी जयंती आहे. जिल्ह्यात महाराजांची जयंती जोरदार पद्धतीने साजरी केली जात आहे. दरम्यान पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लक्ष्मी विलास पॅलेस येथे छत्रपती राजश्री शाहू महाराजांची जयंती साजरी केली. छत्रपती राजश्री शाहू महाराजांचे विचार पुढे घेऊन जात होते. त्यांचे सामाजिक क्रांतीचे विचार तर होतेच मात्र सर्वांगीण विकासाची जे विचार होते. यामुळे त्यांनी सर्व समाजातील मुलांना शिक्षण भेटावे, यासाठी समाजातील मुलांसाठी वसतिगृहाची स्थापना केली शाळा सुरू केल्याने त्यांनी राधानगरी धरण उभे केले यामुळे शेतीमध्ये क्रांती निर्माण झाली. अनेक ठिकाणी त्यांनी बाजारपेठा बसवल्या आणि त्यांचा हा गौरव जगापर्यंत पोहोचवला गेला पाहिजे, असे म्हणत पालकमंत्री दीपक केसरकर म्हणाले.

शाहू महाराजांची जयंती साजरी : केसरकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव केला. कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस येथे दिपक केसरकर यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराजांची 149 वी जयंती साजरी केली. केसरकरांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेतस पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

हाच शाहू महाराजांच्या विचारांचा विजय: सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती आहे. महाराजांना अभिवादन करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. शाहू महाराजांनी कोल्हापूरचा विकास झाला, पाहिजे यासाठी अनेक क्रांती घडवून आणले. त्यांनी पाण्याचा प्रश्न मिटावा, यासाठी राधानगरी धरण बांधले तसेच समाजातील प्रत्येकाला शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी प्रत्येक समाजातील मुलांसाठी वसतिगृहाची उभारणी केली. कोल्हापूरचा व्यापाराचा प्रश्न मिटवा यासाठी बाजारपेठा उभा केल्या. हे सर्व करत असताना त्यांनी संस्कृती ही जपली कोल्हापूरची कुस्तीच्या कलेला त्यांनी प्रोत्साहन दिले.

आज शाहू मेल येथे सर्वांना रोजगार मिळावा यासाठी तेथे सभागृह बांधण्यात येईल येथे अनेक सभा देखील होतील अशा सुविधा केल्या जातील. कोल्हापूरला आई अंबाबाईचा आशीर्वाद लाभला आहे तसेच ही छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांची ही राजधानी आहे त्याचे वैशिष्ट्य आणि वैभव संपूर्ण भारतासमोर गेला पाहिजे यासाठी पर्यटनाच्या मधून करू आणि छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या विचारांप्रमाणे आम्ही मार्गक्रमण करू. कोल्हापुरात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र राहतात ही संकल्पना शाहू महाराजांनी मांडली होती आणि त्यांच्या या विचारांवर जनता अजून देखील चालत आहे आणि हाच शाहू महाराजांच्या विचारांचा विजय आहे. -पालकमंत्री दीपक केसरकर

दसरा चौकात जयंती साजरी: दरम्यान राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मस्थळी लक्ष्मी विलास पॅलेस येथे अनेक कोल्हापूरकर अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी जन्मस्थळ हा आकर्षक फुलांनी सजवण्यात आला होता तर कोल्हापुरातील दसरा चौकातील पूर्णाकृती पुतळ्यास शाहू महाराज छत्रपती यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी कोल्हापुरातील विविध शाळांकडून आणि संघटनांकडून लेझीम, मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक, पथनाट्य सादर करण्यात आले तर राजश्री शाहू महाराजांच्या विचारांची दिंडी देखील यावेळी काढण्यात आली यावेळी कोल्हापूरकर नटूनथटून या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

हेही वाचा -

  1. Shahu Maharaj Jayanti 2023 : राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती, समता, बंधुता यांची शिकवण देणारे शाहू महाराज
  2. Shahu Maharaj Birth Anniversary : चळवळींना वरदहस्त देणारे राजर्षी शाहू महाराज; वाचा सविस्तर...

Last Updated : Jun 26, 2023, 7:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.