ETV Bharat / state

Chhagan Bhujbal Statement : 'पूजा-अर्चा करणे पुरोहित समाजाचा धंदा, धर्म नाही' - ब्राम्हण समाजावर छगन भुजबळांचे वक्तव्य

मंत्री छगन भुजबळ यांनी काल कोल्हापूरातील संकल्प सभेत मिटकरींचे समर्थन केले. शिवाय त्यांनी आपल्या अनोख्या शैलीत कोणत्याही धर्माला विरोध केला नसल्याचे म्हटले. ज्या पद्धतीने चर्मकार समाजाचा चप्पल बनविणे हा त्यांचा धर्म नसून धंदा आहे, सुतार बांधवांचा सुद्धा सुतारकाम धर्म नसून धंदा आहे. त्याच पद्धतीने पूजा-अर्चा करणे हा सुद्धा पुरोहित समाजाचा धंदा आहे धर्म नाही, असे ते म्हणाले.

मंत्री छगन भुजबळ
मंत्री छगन भुजबळ
author img

By

Published : Apr 24, 2022, 4:00 PM IST

कोल्हापूर - राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी चार दिवसांपूर्वी सांगली येथे झालेल्या परिवार संवाद मेळाव्यात केलेल्या वक्तव्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल कोल्हापूरातील संकल्प सभेत समर्थन केले. शिवाय त्यांनी आपल्या अनोख्या शैलीत कोणत्याही धर्माला विरोध केला नसल्याचे म्हटले. ते म्हणाले, ज्या पद्धतीने चर्मकार समाजाचा चप्पल बनविणे हा त्यांचा धर्म नसून धंदा आहे, सुतार बांधवांचा सुद्धा सुतारकाम धर्म नसून धंदा आहे. त्याच पद्धतीने पूजा-अर्चा करणे हा सुद्धा पुरोहित समाजाचा धंदा आहे धर्म नाही.

'पूजा-अर्चा करणे पुरोहित समाजाचा धंदा, धर्म नाही'

आम्हाला सुद्धा शिकू द्या - ब्राह्मण समाजाला उद्देशून बोलताना छगन भुजबळ म्हणाले, पूजा अर्चा करणे हा तुमचा धंदा आहे धर्म नाही. जर हा धर्म असता तर त्र्यंबकेश्वर येथे स्थानिक ब्राम्हण आणि उत्तर प्रदेशातील ब्राह्मणांमध्ये राडा झाला नसता. तो तुमचा धंदा आहे म्हणून घडले. त्यामुळे आपल्याला हात जोडून विनंती आहे. तुम्ही चप्पलांच्या कारखान्यात सुद्धा शिरला आहात, सोने चांदीच्या व्यावसायिकांच्या पोटावर सुद्धा पाय आणला आहात. मग देवळात तुमचेच 100 टक्के आरक्षण का?, पुण्यातील वेदभवनात केवळ ब्राम्हणांनाच प्रवेश का? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे आम्हाला सुद्धा तुमच्या धंद्यात प्रवेश मिळून शिकू द्या, असेही ते म्हणाले. शिवाय आम्ही सुद्धा मिटकरी यांच्यासारखे समर्पयामी म्हणू. मिटकरी बोलल्यावर रागवायचे काय कारण आहे, असेही भुजबळ म्हणाले.

हेही वाचा - Rana couple sent to judicial custody : राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, राजद्रोहचा गुन्हा

भारत जलाओ पार्टी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिल्यानंतर म्हटले होते की, ज्यांच्या हातात सत्ता जाईल त्यांच्यावर संविधानाचे भवितव्य अवलंबून असेल. सध्याचे केंद्रातील राज्यकर्ते हे संविधानाची पायामल्ली करताना दिसत आहेत, अशी टीका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. भारतात दंगे भडकावण्याचे काम सुरु आहे. तिकडे दिल्लीत गरीबांच्या घरावर बुलडोझर चालवला गेला. दोन धर्मांमध्ये जाणूनबुजून वाद निर्माण केला जात आहे. भाजपा ही भारत जलाओ पार्टी आहे, अशी जोरदार टीका भुजबळ यांनी केली.

हेही वाचा - Sanjay Raut on Kirit Somaiya : 'हा खोटारडा माणूस' संजय राऊत यांचा किरीट सोमैयांवर निशाणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.