कोल्हापूर - जिल्ह्यामध्ये मे महिन्यात कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. मात्र आता जून महिना सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांतच नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक दिसत आहे. दोन दिवसात 2 हजार 903 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 3 हजार 267 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सुद्धा कमी होत चालली आहे. सद्यस्थितीत एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 16 हजार 172 वर पोहोचली आहे त्यातील 96 हजार 809 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आत्तापर्यंत 3793 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 15 हजार 570 वर पोहोचली आहे.
जिल्ह्यातील एकूण कोरोना आकडेवारीवर एक नजर -
कोल्हापूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 16 हजार 172 वर पोहोचली आहे. त्यातील 96 हजार 809 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 39 इतकी होती. तर एकूण 1 हजार 708 रुग्णांचा मृत्यू झाला होता. आज रोजी जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 15 हजार 570 वर पोहोचली असून एकूण मृतांची संख्या 3 हजार 793 झाली आहे. यामध्ये आता रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी होताना पाहायला मिळत आहे. 1 जून रोजी 1 हजार 395 नवे रुग्ण आढळले आणि 1 हजार 529 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तर 2 जून रोजी 1 हजार 508 नवे रुग्ण आढळले आणि 1 हजार 738 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे नवीन रुग्णांच्या बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण काहीअंशी कमी झाले आहे.
वयोगटानुसार रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1 वर्षाखालील - 210 रुग्ण
1 ते 10 वर्ष - 4267 रुग्ण
11 ते 20 वर्ष - 8847 रुग्ण
21 ते 50 वर्ष - 65892 रुग्ण
51 ते 70 वर्ष -29323 रुग्ण
71 वर्षांवरील - 7633 रुग्ण
जिल्ह्यात असे एकूण 1 लाख 16 हजार 172 रुग्ण झाले आहेत.
तालुक्यानुसार नवीन रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -
1) आजरा - 24
2) भुदरगड - 34
3) चंदगड - 17
4) गडहिंग्लज - 45
5) गगनबावडा - 3
6) हातकणंगले - 201
7) कागल - 42
8) करवीर - 291
9) पन्हाळा - 77
10) राधानगरी - 23
11) शाहूवाडी - 15
12) शिरोळ - 114
13) नगरपालिका कार्यक्षेत्रातील - 162
14) कोल्हापूर महानगरपालिका - 365
15) इतर जिल्ह्यातील, राज्यातील - 95
दिलासादायक : कोल्हापुरात मागील 2 दिवसांत नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक - Kolhapur corona update
जून महिना सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन दिवसांतच नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अधिक दिसत आहे. दोन दिवसात 2 हजार 903 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 3 हजार 267 जणांनी कोरोनावर मात केली आहे.