ETV Bharat / state

मोदीजी! बदला घ्या, शहीद जोंधळेच्या मित्रपरिवाराची आर्त हाक...

वीरजवान जोंधळे यांचे पार्थिव आज बहिरेवाडी गावात आल्याचे कळताच मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. लहापणापासून ज्या मित्रांच्यासोबत ते खेळले. त्या मित्रांना आज अश्रू अनावर झाले. यावेळी या मित्रपरिवाराने ईटीव्ही भारतसोबत बोलताना आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

martyred jawan rishikesh jondhale reactions kolhapur
शहीद जोंधळेच्या मित्रपरिवाराची आर्तहाक
author img

By

Published : Nov 16, 2020, 3:38 PM IST

Updated : Nov 16, 2020, 5:20 PM IST

कोल्हापूर - ऐन दिवाळीत आमचा मित्र आम्हाला सोडून गेला, याचे दुःख आहेच. मात्र, त्याने देशासाठी आपला प्राण दिला याचा अभिमान आहे. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावे. तसेच जर संधी मिळाली तर याचा बदला घेणार, अशी संतप्त प्रतिक्रिया वीरमरण आलेल्या जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या मित्रपरिवाराने दिली. आज (सोमवारी) जोंधळे यांच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.

हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या मित्रपरिवाराच्या प्रतिक्रिया...

अन् मित्रांना अश्रू अनावर... -

वीरजवान जोंधळे यांचे पार्थिव आज बहिरेवाडी गावात आल्याचे कळताच मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. लहापणापासून ज्या मित्रांच्या सोबत ते खेळले त्या मित्रांना आज अश्रू अनावर झाले. यावेळी या मित्रपरिवाराने ईटीव्ही भारतसोबत बोलताना आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले, आमचा मित्रा आम्हाला सोडून गेला याचे दुःख आम्हाला आहेच. पण त्याने देशासाठी बलिदान दिले याचा आम्हाला अभिमान आहे. संधी मिळाली तर नक्कीच आम्ही याचा बदला घेऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशविरोधी भूमिका घेणाऱ्या पाकिस्तानला संपवून टाकावे, अशी प्रतिक्रिया मित्रपरिवाराने दिली.

हेही वाचा - आसाममधील जवान हुतात्मा, वारसांना २० लाखांची मदत; राज्य सरकारची घोषणा

हुतात्मा जवान ऋषिकेश जोंधळे यांच्या अंतदर्शनासाठी येथील भैरवनाथ हायस्कूलच्या मैदानावर मोठी गर्दी जमली होती. यावेळी 'वीरजवान तुझे सलाम', 'वंदे मातरम' असा फलक घेऊन मित्रपरिवार अंत्ययात्रेत सहभागी झाला होता.

Last Updated : Nov 16, 2020, 5:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.