कोल्हापूर - सरकारी व्हेंटिलेटर वापरून खासगी रुग्णालयांनी लाखो रुपयांची कमाई केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संभाजी ब्रिगेडने ही माहिती समोर आणली असून ज्या सर्वसामान्य नागरिकांची या खासगी रुग्णालयांनी लूट केली आहे. त्या सर्वच रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांचे पैसे परत करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. इतकेच नव्हे तर महापालिका प्रशासनाच्या चुकीमुळेच आजपर्यंत रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सुद्धा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी केली आहे.
संभाजी ब्रिगेडने नेमके काय केले आहेत आरोप ?
यावेळी जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील म्हणाले, कोरोना काळामध्ये महापालिकेकडे 40 व्हेंटिलेटर प्राप्त झाले होते. त्यातील 15 व्हेंटिलेटर सीपीआर रुग्णालयासाठी, 8 व्हेंटिलेटर आयसोलेशन हॉस्पिटल आणि तीन व्हेंटिलेटर राजोपाध्येनगर येथील कोविड सेंटरला देण्यात आले होते. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे यातील सहा व्हेंटिलेटर चक्क खासगी रुग्णालयांना देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली. इतकेच नाही तर खासगी रुग्णालयांनी या व्हेंटिलेटरच्या माध्यमातून रुग्णांकडून लाखो रुपयांची लूट केली आहे. सरकारी व्हेंटिलेटरचा वापर करून खाजगी रुग्णालये कसे काय लोकांकडून पैसे घेऊ शकतात, असा सवाल करत जोपर्यंत या सर्वांचे पैसे परत केले जात नाहीत, तोपर्यंत गप्प बसणार नसून वेळ पडल्यास महापालिकेला टाळे ठोकू असा इशारा सुद्धा रुपेश पाटील यांनी दिलाय.
सरकारी व्हेंटिलेटरवर खासगी रुग्णालयांकडून लाखोंची लूट, संभाजी ब्रिगेडचा आरोप - खासगी रुग्णालयांकडून सरकारी व्हेंटिलेटरची लूट
सरकारी व्हेंटिलेटर वापरून खासगी रुग्णालयांनी लाखो रुपयांची कमाई केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. संभाजी ब्रिगेडने ही माहिती समोर आणली असून ज्या सर्वसामान्य नागरिकांची या खासगी रुग्णालयांनी लूट केली आहे. त्या सर्वच रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांचे पैसे परत करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.