कोल्हापूर - शहरात कोरोना संशयित 68 वर्षाच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हरियाणा- दिल्ली मुंबई पुणे असा प्रवास करत ते कोल्हापूरात आले होते. संबंधित रुग्णाच्या घशाचे नमुने पुण्याला पाठविले असून आज सायंकाळीपर्यंत त्याचा अहवाल प्राप्त होणार आहे.
कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील कोरोना कक्षात त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग चांगलाच हादरून गेला आहे. या व्यक्तीने 8 मार्च रोजी कोल्हापूरहून दिल्लीमार्गे हरियाणा असा प्रवास करून पुन्हा 12 मार्चला ते कोल्हापूरला परत आले होते.
या रुग्णाला कोरोना संशयित लक्षणे आढळल्याने रविवारी सकाळी येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले होते. शिवाय श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. डॉक्टरांनी त्यांच्या घशातील स्वॅब काढून तपासणीसाठी पुण्याला पाठवले आहे. आज सायंकाळी याचा अहवाल प्राप्त होणार आहे.