ETV Bharat / state

Kolhapur Student Receive 83 Lakh Scholarship : कोल्हापूरच्या विद्यार्थिनीने मिळवली 83 लाखांची शिष्यवृत्ती; उच्च शिक्षणासाठी जाणार ऑस्ट्रेलियाला - कौशिकी जाधव हिला केंद्र सरकारची 83 लाखांची शिष्यवृत्ती

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील डी.के.टी.ई.च्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील कौशिकी जाधव या विद्यार्थ्यांनीची मास्टर ऑफ इंजिनिअरींग इन मेकॅट्रॉनिक्ससाठी 'ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया’ या नामांकित विद्यापीठामध्ये निवड ( Kolhapur student selected for higher studies in Australia ) झाली आहे. विशेष म्हणजे यासाठी कौशिकी जाधव हिला केंद्र सरकारची 83 लाखांची शिष्यवृत्ती ( Kolhapur Student Receive 83 Lakh Scholarship ) मिळाणार आहे.

Kolhapur Student Receive 83 Lakh Scholarship
कौशिकी जाधव
author img

By

Published : Feb 22, 2022, 6:17 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील डी.के.टी.ई.च्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील कौशिकी जाधव या विद्यार्थ्यांनीची मास्टर ऑफ इंजिनिअरींग इन मेकॅट्रॉनिक्ससाठी 'ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया’ या नामांकित विद्यापीठामध्ये निवड ( Kolhapur student selected for higher studies in Australia ) झाली आहे. विशेष म्हणजे यासाठी कौशिकी जाधव हिला केंद्र सरकारची 83 लाखांची शिष्यवृत्ती ( Kolhapur Student Receive 83 Lakh Scholarship ) मिळणार आहे.

Kolhapur Student Receive 83 Lakh Scholarship
कौशिकी जाधव

कौशिकीचे आईएलटीएस परीक्षेमध्ये यश संपादन -

दरम्यान, कौशिकीने परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या आईएलटीएस परीक्षेमध्ये यश संपादन केले आहे. उच्च शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या या परिक्षेसाठी डीकेटीईमध्ये वेळोवेळी तज्ञ प्राध्यपकांचे लेक्चर आयोजन केले जात असते. यामुळे यापूर्वी सुद्धा येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी व शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी फायदा झाला आहे. मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या स्वायत्त अभ्यासक्रमातील मेटॅलर्जी मशिन टूल्स अँन्ड प्रोसेसिंग, वर्कशॉप प्रॅक्टीस, टूल इंजिनिअरींग, मेकॅट्रॉनिक्स, हायड्रॉलिक्स, न्यूमॅटिक्स, अ‍ॅटोमेशन, रोबोटीक्स, मशिन डिझाईन या विषयांचा विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी तीला फायदा झालेला आहे. तसेच मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील बॉश लॅब, स्मार्ट फौड्री, मॅन्युफॅक्चरींग प्रोसेस या लॅबमध्ये घेतलेल्या ट्रेनिंगचा व केलेल्या प्रोजेक्टचा देखील या निवडीसाठी फायदा झालेला आहे असे तिने म्हंटले आहे. अत्याधुनिक सोयी सुविधा, लॅब आणि संशोधनात्मक शैक्षणिक वातावरण यामुळे परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळोवेळी चालना मिळत गेली आहे.

यांचे मिळाले मार्गदर्शन -

कौशिकीला संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, ट्रेझरर आर.व्ही. केतकर, सचिव डॉ. सपना आवाडे आणि विश्‍वस्तांनी पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. तिच्या या यशामागे संस्थेचे संचालक प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागप्रमुख प्रा.डॉ.व्ही.आर. नाईक, प्रा.आर.डी. पाटील, प्रा.एस.ए. सौदत्तीकर आणि अन्य शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले शिवाय या निवडीसाठी कोल्हापूरचे प्रा. अभय केळकर यांचेही बहुमुल्य सहकार्य मिळाले असल्याचे तिने म्हटले.

हेही वाचा - Mask Free Maharashtra : महाराष्ट्र मास्कमुक्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे स्पष्टीकरण

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.