ETV Bharat / state

Kolhapur Clashes: शहरातील सीसीटीव्ही तपासून पोलीस पुढील कारवाई होणार -कोल्हापूर पोलीस अधीक्षक - Kolhapur clashes during protest

कोल्हापुरातील परिस्थिती पूर्ववत येत असले तरी इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. पोलिसांनी शहरात तगडा बंदोबस्त ठेवल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे.

Kolhapur SP Mahendra Pandit
कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक
author img

By

Published : Jun 8, 2023, 11:45 AM IST

Updated : Jun 8, 2023, 12:24 PM IST

कोल्हापूर: बुधवारी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोल्हापूरमधील तणावाची स्थिती निवळत आहेत. याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी माध्यमांना पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.

कोल्हापुरचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले, की रात्री १२ वाजेपर्यंत इंटरनेटसेवा बंद राहणार आहे. वादग्रस्त स्टेट्स टाकणारे कॉलेजचे विद्यार्थी आहेत. कोल्हापुरातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. शहरातील सीसीटीव्ही तपासून पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. पोलिसांनी जप्त केलेले मोबाईल तपासण्याचे काम सुरू आहे. कालचा राडा हे पोलिसांचे अपयश नाही, असे यांनी सांगितले. कोल्हापूरमध्ये ४ एसआरपीएफ कंपनी, ३०० पोलीस कॉन्स्टेबल आणि ६० अधिकारी तैनात आहेत.

  • #WATCH | Maharashtra: "The situation of Kolhapur city and district has become normal since yesterday afternoon. 4 SRPF company, 300 Police constables and 60 officers deployed...": Kolhapur SP Mahendra Pandit on the unrest that broke out yesterday in the city pic.twitter.com/bUlg3lysA3

    — ANI (@ANI) June 8, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हिंसाचाराच्या संदर्भात ३६ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहर आणि जिल्ह्यातील संवेदनशील भागात पोलिस तैनात करून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत-पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित

शहरात दुकाने उघडण्यात आली आहेत. नागरिकांनी दुकानांमधून दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी केली. बुधवारी झालेल्या दंगलीप्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आहेत. आक्षेपार्ह पोस्टबाबत जिल्ह्यात पोलिसांनी पाच गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी दोन प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलांसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमके काय घडले? आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याच्या प्रकरणाला विरोध करण्यासाठी गुरुवारी हिंदुत्व संघटनांनी गुरुवारी आंदोलन केले. मात्र, जमावबंदी असल्याने पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. पापाची तिकटी, पानलाइन, महापालिका चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक या परिसरातील दुकाने संतप्त झालेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला हटवले. पोलिसांनाही लाठीचार्ज केल्याने दगडफेक थांबली. दुपारनंतर कोल्हापुरातील वातावरण शांत झाले. यानंतर मुंबईहून कोल्हापुरात आलेल्या जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शांततेचे आवाहन केले.

देशात अल्पसंख्याक समाजाला भयभीत करण्याचे प्रयत्न: राज्यात विविध ठिकाणी होत असलेल्या जातीय हिंसाचारावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. धार्मिक ध्रुवीकरणासाठी भाजपकडून भविष्यात देशभर दंगली घडवून आणल्या जातील, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. कोल्हापुरातील दंगली संदर्भात चव्हाण म्हणाले की, देशात अल्पसंख्याक समाजाला भयभीत केले जात आहे.कोल्हापूरमध्ये दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यावर नियंत्रण आणण्यात यश मिळाल्याचेही माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी म्हटले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील भाजपवर टीका करत हिंसाचारामागील बोलविता धनी कोण याची चौकशी करावी, अशी मागणी केली. पटोले म्हणाले, की महाराष्ट्रातील काही संघटनांनी याला जातीय रंग देण्याचा केला असताना त्यांनी थांबवण्याची सरकारची जबाबदारी आहे. मात्र सरकारकडून जाणीवपूर्वक होत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा-

  1. Kolhapur will be peaceful : धगधगतं कोल्हापूर शांत होईल, संघटनांकडून ग्वाही, पालकमंत्री दीपक केसरकर यांची माहिती
  2. Communal Violence In Maharashtra : महाराष्ट्रात सातत्याने होतो आहे जातीय हिंसाचार, 2023 मध्ये घडल्या 'या' मोठ्या घटना
  3. Nana Patole : '..तर सरकारने तात्काळ पायउतार व्हावे', कोल्हापूर हिंसाचारावर नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया

Last Updated : Jun 8, 2023, 12:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.