ETV Bharat / state

Ashadhi wari 2023 : कोल्हापुरात अनोखे धार्मिक ऐक्य! गेल्या 32 वर्षांपासून मुस्लिम कुटुंब करत आहे दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा - धार्मिक ऐक्य

गेल्या 41 वर्षापासून कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या नागदेव वाडीतून शेकडो भाविक आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात. मात्र कोल्हापुरातून नागदेववाडी येथून निघाल्यानंतर दिंडीचा पहिला विसावा बालिंगा येथील मुस्लिम कुटुंबीयातील अत्तार यांच्या घरी येतो. सामाजिक ऐक्य तर कोल्हापूरकर अबाधित ठेवतात. मात्र, धार्मिक ऐक्य देखील हिंदू मुस्लिम ठेवतात. याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. याबद्दल अधिक सविस्तर जाणून घेवू या.

Ashadhi wari 2023
वारकऱ्यांची सेवा
author img

By

Published : Jun 20, 2023, 1:54 PM IST

कोल्हापुरामध्ये मुस्लिम कुटुंब करते दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्यांची सेवा

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक सलोखा काही कारणास्तव बिघडला होता. मात्र, तो सलोखा पुन्हा एकदा आबादीत ठेवण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. त्यातच कोल्हापूर शहरालगत असणाऱ्या नागदेवाडी येथील अनेक वारकरी गेल्या 41 वर्षांपासून पंढरपूरची आषाढी आणि कार्तिकी वारी नित्यनेमाने करत आहेत. यातच बालिंगा येथील आत्तार कुटुंबीयांनी धार्मिक वसा जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. अत्तार यांचे घर आणि दुकान एकच ठिकाणी असल्याने यांच्या दुकानात भजन, कीर्तन आणि चहापान झाल्यानंतरच ही दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ होते.

भक्तीभावाने वारकऱ्यांची सेवा : नागदेववाडी येथून निघालेली भक्तिमय वारी बालिंगा येथील अत्तार कुटुंबीयांच्या येथे पहिला स्टॉप घेते, काही काळासाठी विसावते. या ठिकाणी भजन कीर्तनात अत्तार कुटुंबीय आणि वारकरी रमून जातात. चहापानाचा कार्यक्रम झाल्यानंतर पुढे ही दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ होते. गेल्या 32 वर्षांपासून अत्तार कुटुंबीय भक्तीभावाने वारकऱ्यांची सेवा करतात. घरात ईद, दिवाळी असा कोणताही सण साजरा करताना ज्या पद्धतीने उत्सव स्वरूपात केला जातो, त्याच पद्धतीने अत्तार कुटुंबीय आषाढी एकादशी सणही साजरा करतात.

वारकऱ्यांना कोणताही जात धर्म नसतो अशाच पद्धतीने जर सर्वजण समाजात राहिले तर जातीय सलोखा अबाधित राहील.- दिंडीतील वारकरी

भक्तीचे रंग : वारकरी संप्रदायातील अनेक वारकरी हे आत्तार कुटुंबीयांना जवळून ओळखतात. अगदी त्यांच्या वडिलांच्या काळापासून हे वारकरी येथे येऊन बसायचे. कालांतराने दिंडी निघाल्यानंतर विसाव्यासाठीही येथे थांबू लागले. कित्येक वर्षे हे वारकरी नित्यनेमाने आत्तार कुटुंबियांकडे हक्काने वारीतून जाऊन त्या ठिकाणी भजन कीर्तन अभंग म्हणतात. आत्तार कुटुंबियांचा जरी हार्डवेअरचा व्यवसाय असला तरी त्यांच्या दुकानात भक्तीचे रंग या ठिकाणी दिसून आल्याचे वारकरी संप्रदायाचे दिंडी प्रमुख सांगतात.

हेही वाचा :

  1. Ashadhi wari 2023 : तुकाराम महाराजांची पालखी बारामतीत दाखल, अजित पवारांनी केले सारथ्य
  2. Ashadhi wari 2023: श्री संत ज्ञानेश्वर माऊलीचा सोहळा रविवारी साताऱ्यात; तब्बल पाच दिवस असणार मुक्काम
  3. Ashadhi Wari 2023 : वारकऱ्यांच्या दिंडींचा मुक्काम थेट पोलीस स्टेशनला, 44 वर्षापासून चालू आहे परंपरा!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.