ETV Bharat / state

कोल्हापूर महापालिका आयुक्तांचा सायकलवरून फेरफटका; मास्क न घालणाऱ्यांना खडेबोल

कलशेट्टी यांनी मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्याच्या सूचना केल्या. शहरातील भाजीपाला, फेरीवाल्यांना योग्य खबरदारीच्या सूचना देत, रिक्षावाले, पानपट्टीधारकांना नियम पाळण्याचे आवाहन केले.

कोल्हापूर आयुक्तांचा सायकलवरून फेरफटका
कोल्हापूर आयुक्तांचा सायकलवरून फेरफटका
author img

By

Published : Sep 30, 2020, 5:09 PM IST

कोल्हापूर- जिल्ह्यात 'नो मास्क, नो एन्ट्री' ही मोहीम गतिमान होत असताना, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी आज सायकलवरून प्रवास करत मास्क न वापरणाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली. मास्क घालतोस की दंड करू, अशा शब्दात कलशेट्टी यांनी नियमांना धाब्यावर बसवणाऱ्यांना खडेबोल सुनावत जनजागृती केली.

माहिती देताना कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

बाबांनो मास्क घाला, तुमच्यासाठीच सांगत आहे रे राजांनो, असे लहान मुलांना सांगत कलशेट्टी यांनी आपल्या कामाचा दाखला दिला. कोल्हापूर महानगरपालिकेत महिन्याचा शेवटचा शनिवार हा 'नो व्हेईकल डे' म्हणून पाळला जातो. एकही नगरसेवक, अधिकारी, शासकीय व खासगी वाहन न वापरता महापालिकेत येतात. आज सकाळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी हे देखील सायकलवरून महापालिकेत दाखल झाले. आपले दैनंदिन कामकाज संपवून त्यांनी आज शहरात सायकलवरून फेरफटका मारला. यादरम्यान त्यांना अनेकजण विनामास्क फिरत असल्याचे दिसून आले. आशा नागरिकांची कलशेट्टी यांनी चांगलीच खरडपट्टी केली.

कलशेट्टी यांनी मास्क न घालणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्याच्या सूचना केल्या. शहरातील भाजीपाला, फेरीवाल्यांना योग्य खबरदारीच्या सूचना देत, रिक्षावाले, पानपट्टीधारकांना नियम पाळण्याचे आवाहन केले. यावेळी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना कलशेट्टी यांनी, कोल्हापूरला पर्यावरणपूरक शहर म्हणून नावरूप देण्याचा मानस आहे. त्या दृष्टीने एकदिवस नो व्हेईकल डे पाळाला जातो. कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात नो मास्क नो एन्ट्री मोहिमेची जनजागृती करण्यात येत आहे. त्याला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन डॉ. कलशेट्टी यांनी केले. दरम्यान, आज आयुक्त सायकलवरून प्रवास करत असल्याने अनेकांचे धाबे दणाणले होते. तर, अनेकजण सेल्फी, फोटो काढण्यास पुढे येत होते.

हेही वाचा- मैला सफाई कामगारांसाठी कायदा होतो, तर ऊसतोड मजुरांसाठी का नाही - सुरेश धस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.