ETV Bharat / state

स्टिंग ऑपरेशन: गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला रंगेहाथ पकडलं - sex determination test in Kolhapur

पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टराला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. डॉ. अरविंद कांबळे असे पकडण्यात आलेल्या डॉक्टराचे नाव आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कांबळे याच्यावर अशी कारवाई यापूर्वी देखील करण्यात आली आहे.

Kolhapur doctor arrested for conducting sex determination test
स्टिंग ऑपरेशन: गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला रंगेहाथ पकडलं
author img

By

Published : Dec 17, 2020, 1:41 AM IST

कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टराला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. डॉ. अरविंद कांबळे असे पकडण्यात आलेल्या डॉक्टराचे नाव आहे. दिवसभर राबवलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा डॉक्टर रंगेहाथ सापडला आहे. दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे, तीन वर्षापूर्वी देखील याच अरविंद कांबळे यास गर्भलिंग निदान करताना पकडण्यात आले होते.

गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला रंगेहाथ पकडलं

मिळालेल्या माहितीनुसार, पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील डॉ. अरविंद कांबळे यांच्या मातृसेवा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग तपासणी केली जात असल्याची कुणकुण आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाला लागली होती. त्यानुसार सीपीआर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक आणि पोलिसांनी सापळा लावून एक डमी रुग्ण कांबळे याच्या मातृसेवा हॉस्पिटलमध्ये पाठवले. त्या रुग्णाला पहिली मुलगी असल्याने गर्भलिंग निदान करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. डॉ. कांबळे याने सुरुवातीला आपण असे काही करत नसल्याचे सांगितले. मात्र नंतर 20 हजार रूपयांच्या मोबदल्यात त्याने गर्भलिंग निदान करण्यास तयारी दाखवली. संबंधित महिलेची तपासणी करून तिला मुलगी असल्याचेही कांबळे याने सांगितले. मात्र अध्याप स्पष्टता दिसून येत नसल्याने 28 डिसेंबर रोजी पुन्हा या, त्या दिवशी तपासणी करून गर्भपात करू असेही डॉ. कांबळे याने सांगितले.

अनेक वर्षांपासून हा धंदा सुरू -
डॉ. अरविंद कांबळे त्याच्या मातृसेवा हॉस्पिटलमध्ये गेल्या अनेक वर्षापासून गर्भ लिंग निदान करत असल्याचे डॉ. वेदक यांना माहिती मिळाली होती. त्या नुसार आज त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या गीता हसुरकर यांच्या सहकार्यातून एक गर्भवती महिला दवाखान्यात पाठवली आणि डॉक्टर जाळ्यात अडकला.

एकदा कारवाई झाली तरी डॉक्टर सुधारला नाही -
डॉ. कांबळे याच्यावर यापूर्वी 2016 साली सुद्धा कारवाई करण्यात आली आहे. त्यावेळी त्याचे सोनोग्राफी मशीन सुद्धा संबंधित प्रशासनाने कारवाईत सील केले होते. मात्र डॉ. कांबळे याने पुन्हा एकदा नवीन मशीन घेऊन त्याद्वारे हा अवैध धंदा सुरू केला होता. दरम्यान हे सोनोग्राफी मशीन सुद्धा आता सील करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा - महापुरात घर पडलं, तरीही येत आहे 'लाईट बिल'... कागल तालुक्यातील प्रकार

हेही वाचा - ..तर कोल्हापूरचा विकास झाला असता; महापालिका निवडणुकीत चंद्रकांत पाटील टार्गेट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.