ETV Bharat / state

राज्यात कोल्हापूर जिल्हा मतदानात आघाडीवर; जनता कोणाला बसवणार घरात?

author img

By

Published : Oct 21, 2019, 9:06 PM IST

काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरात महाभयंकर पूर आला होता. आज मतदानाच्या दिवशीही पावसाचे सावट होते. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांनी उत्स्फुर्तपणे घराबाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावला.

राज्यात कोल्हापूर जिल्हा मतदानात आघाडीवर

कोल्हापूर - राज्यावर असलेल्या परतीच्या पावसाच्या सावटाखाली विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पार पडली. २०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी घसरली आहे. २०१४ मध्ये ६४ टक्के मतदान झाले होते. तर यावेळी ६०.०५ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मात्र, अजून काही मतदारसंघात मतदान सुरू असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र गत विधानसभेप्रमाणे राज्यात सर्वात जास्त मतदानाची नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी ७३.१९ टक्के मतदान झाले. मात्र हे मतदान २०१४ च्या तुलनेत जवळपास एका टक्क्याने कमी झाले आहे.

हेही वाचा - मळवी गावाचा मतदानावर बहिष्कार; विकासकामे खोळंबल्याने पुकारला असहकार

काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरात महाभयंकर पूर आला होता. आज मतदानाच्या दिवशीही पावसाचे सावट होते. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांनी उत्स्फुर्तपणे घराबाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावला. अंतिम आकडेवारीनुसार करवीर मतदारसंघात सर्वाधिक ८२.१५ टक्के, कागल मतदारसंघात ८१.५८ टक्के, शाहुवाडी मतदारसंघात ८०.०० टक्के, राधानगरी ७५.०५ टक्के, कोल्हापूर दक्षिण ७४.०० टक्के, शिरोळमध्ये ७२ टक्के, हातकणंगले ७१.४१, चंदगड ६८.०४, इचलकरंजीत ६७.०२, कोल्हापूर उत्तर ५९.०१ अशी मतदानाची नोंद झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीच धक्कादायक निकालाची परंपरा आहे. यंदा कोल्हापूरची जनता कोणाला कौल देणार, हे गुरुवारी मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. मात्र, येथे निवडून देण्याऐवजी एखाद्याला पाडण्यासाठी मतदान केले जाते, असा इतिहास आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळीही शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना निवडून देण्यापेक्षा धनंजय महाडिक यांना पाडण्यासाठी कोल्हापुरात मतदान झाले होते, असे बोलले जाते.

हेही वाचा - कोथरूडमध्ये वनवे तर कोल्हापुरात युतीच्या 10 जागा येणार - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे १० मतदारसंघ आहेत. २०१४ च्या निवडणुकीत येथे सर्वाधिक सहा जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी दोन जागांवर यश मिळाले होते. तर काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. यंदा शिवसेनेसमोर त्यांच्या जागा टिकवण्याचे आव्हान आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने आपला आकडा वाढवण्यासाठी चांगला प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे युतीत शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करण्याऐवजी भाजपकडून काँग्रेस-राष्ट्रवादी आणि इतर पक्षांच्या उमेदवाराला मदत मिळाली आहे. त्यामुळे येथील निकाल रंजक असतील असे चित्र आहे.

Intro:Body:

kolhapur district top in voting percentage maharashtra assembly elections 2019

kolhapur district top in voting percentage, maharashtra assembly elections 2019, VidhanSabhaElection2019, MaharashtraAssemblyPolls, MaharashtraAssemblyElection2019, कोल्हापूर जिल्हा मतदानात आघाडीवर

राज्यात कोल्हापूर जिल्हा मतदानात आघाडीवर; जनता कोणाला बसवणार घरात?

कोल्हापूर - राज्यावर असलेल्या परतीच्या पावसाच्या सावटाखाली विधानसभा निवडणुकीची आज मतदान प्रक्रिया पार पडली. २०१४ च्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी घसरली आहे. २०१४ मध्ये ६४ टक्के मतदान झाले होते. त्यातुलनेत यावेळी मतदानाची टक्केवारी घसरली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मात्र गत विधानसभेप्रमाणे राज्यात सर्वात जास्त मतदानाची नोंद झाली आहे. 

काही दिवसांपूर्वीच कोल्हापुरात महाभयंकर पूर आला होता. आज मतदानाच्या दिवशीही पावसाचे सावट होते. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांनी उस्फुर्तपणे घरातून बाहेर पडत आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. ५ वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार विशेष म्हणजे करवीर मतदारसंघात सर्वाधिक ७८.३२ टक्के मतदान झाले आहे. तर शाहुवाडी मतदारसंघात ७४.८४ टक्के, कागल मतदारसंघात ७४.७५ टक्के, राधानगरी ७०. ८९ टक्के, कोल्हापूर दक्षिण ६८.९४ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीच धक्कादायक निकालाची परंपरा आहे. यंदा कोल्हापूरची जनता कोणाला कौल देणार हे गुरुवारी मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. मात्र, येथे निवडून देण्याऐवजी एखाद्याला पाडण्यासाठी मतदान केले जाते हा इतिहास आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळीही शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना निवडून आणण्यापेक्षा धनंजय महाडिक यांना पाडण्यासाठी कोल्हापुरात मतदान झाले होते, असे बोलले जाते. 

कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे १० मतदारसंघ आहेत. २०१४ च्या निवडणुकीत येथे सर्वाधिक सहा जागा शिवसेनेला मिळाल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी दोन जागांवर यश मिळाले होते. तर काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती. यंदा शिवसेनेसमोर त्यांच्या जागा टिकवण्याचे आव्हान आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने आपला आकडा वाढवण्यासाठी चांगला प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे युतीतील शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करण्याऐवजी भाजपकडून काँग्रेस-राष्ट्रवादी आणि इतर पक्षांच्या उमेदवाराला मदत मिळाली आहे. त्यामुळे येथील निकाल रंजक असतील असे चित्र आहे.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.