ETV Bharat / state

पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांनी तत्काळ स्थलांतरित व्हावे; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

author img

By

Published : Aug 5, 2020, 4:10 PM IST

सद्यस्थितीत पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फुटांपेक्षा जास्त झाली असून असाच पाऊस सुरू राहिल्यास रात्रीपर्यंतच इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी देसाई यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांनी तत्काळ स्थलांतरित व्हावे; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांनी तत्काळ स्थलांतरित व्हावे; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

कोल्हापूर - कालपासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नद्यांना पूर आला असून पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सध्याची पाणी पातळी 35.2 फूट इतकी झाली आहे. त्यामुळे इशारा पातळी गाठण्यासाठी केवळ साडेतीन फूट अंतर बाकी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पंचगंगा नदीकाठच्या सर्वच गावांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत.

विशेष म्हणजे चिखली, आंबेवाडीसह शिरोळमधील पूर येणाऱ्या गावांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गेल्यावर्षीचा अनुभव पाहता सुरुवातीला नागरिकांनी आपली जनावरे सुरक्षितस्थळी हलवावी आणि नंतर स्वतः स्थलांतर होण्याचे आदेश दिले आहेत. कालपासून एकसारखा पाऊस सुरू आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फुटांपेक्षा जास्त झाली असून असाच पाऊस सुरू राहिल्यास रात्रीपर्यंतच इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी देसाई यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.