ETV Bharat / state

सोमवारपासून अंबाबाई मंदिर दर्शनासाठी खुले; दररोज केवळ 2 ते 3 हजार भक्तांनाच मिळणार दर्शन

author img

By

Published : Nov 14, 2020, 6:58 PM IST

नागरिकांनी मंदिरात आल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ती काळजी घ्यावी, याबाबत सूचना देण्यात येणार आहेत. शिवाय भाविकांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन होईल, यावर लक्ष ठेवले जाणार आहे.

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर - मंदिर उघडण्याबाबतचे पत्र अद्याप पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला प्राप्त झालेले नाही. मात्र, माध्यमांद्वारे मंदिर सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळाल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. शिवाय राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाचे सुद्धा जाधव यांनी स्वागत केले.

सोमवारपासून अंबाबाई मंदिर दर्शनासाठी खुले

सोमवारपासून अंबाबाई मंदिर दर्शनासाठी खुले -

राज्य शासनाने राज्यातील सर्वच मंदिरे सुरू करण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यानुसार देवस्थान समितीकडून योग्य ते नियोजन केले जाणार आहे. शिवाय नागरिकांनी मंदिरात आल्यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ती काळजी घेण्यात यावी, याबाबत सूचना देण्यात येणार आहेत. शिवाय भाविकांकडून नियमांचे काटेकोरपणे पालन होईल, यावर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे मंदिरे उघडली म्हणून नागरिकांनी निष्काळजीपणा न करता सर्व नियमांचे पालन करून देवीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन सुद्धा देवस्थान समितीकडून करण्यात आले आहे.

गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे असणार मोठे आव्हान -

गेल्या 7 महिन्यांपासून अंबाबाई मंदिर दर्शनासाठी बंद आहे. नवरात्रौत्सवात सुद्धा भाविकांना दर्शन घेता आले नाही. दिवाळीनिमित्त सर्वांनाच सुट्टी आहेत. अशातच मंदिर उघडण्याबाबत निर्णय झाला असल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवणे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीसमोर मोठे आव्हान असणार आहे.

दररोज केवळ 2 ते 3 हजार भाविकांना मंदिरात सोडता येणार -

गेल्या 7 महिन्यांपासून मंदिर बंद होते. त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ 2 ते 3 हजार भविकांनाच दिवसभरात अंबाबाई मंदिरात प्रवेश देण्यात येणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी म्हटले आहे. भाविकांनी सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे.

दोन भक्तांमध्ये किमान दोन फुटांचे असणार अंतर -

दिवसभरात केवळ 2 ते 3 हजार भक्तांनाच अंबाबाई मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक भक्ताची मंदिराच्या दरवाजांवरच तपासणी केली जाणार असून त्यांना आतमध्ये प्रवेश मिळणार आहे. कोरोनाचा अजूनही धोका कायम असल्याने प्रत्येक भाविकांमध्ये सुरक्षित अंतर राखले जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासोबत बैठक घेत आणखी सविस्तर बाबींवर चर्चा करून नियमावली बनविण्यात येणार असल्याचेही महेश जाधव यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.