कोल्हापूर - राधानगरी तालुक्यातील कोनोलीपैकी कुपलेवाडी येथे भूस्खलन होऊन दोन घरे जमीनदोस्त झाली आहेत. या दुर्घटनेमध्ये पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. शिवाय, पाच जनावरांचा ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झाला आहे. रात्री उशीरा ही घटना समोर आली. वसंत लहू कुपले (वय 52 वर्षे) आणि सुसाबाई वसंत कुपले (वय 47 वर्षे) अशी मृत दाम्पत्यांची नावं आहेत.
2 घर जमीनदोस्त; तर 3 घरांचे नुकसान
मिळालेल्या माहीतीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या अतिवृष्टीमुळे राधानगरी तालुक्यातील कोनोलीपैकी कुपलेवाडी येथे डोंगराचे भूस्खलन झाले. यात 2 घरे पूर्णतः जमीनदोस्त झाली. तर तीन घरांचे नुकसान झाले. त्यातल्या एका घरातील मातीच्या ढिगाऱ्याखाली पती-पत्नी वसंत-सुसाबाई हे सापडले. यात त्यांचा मृत्यू झाला.
पाच जनावरांचा मृत्यू
शिवाय, पाच जनावरंही ढिगाऱ्याखाली सापडली. यात त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने एका रात्रीत होण्याचे नव्हते झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - Sindhudurg Flood : दिगवळेत दरड कोसळून महिलेचा मृत्यू, एक जखमी; खारेपाटण शुकनदीने ओलांडली धोक्याची पातळी