ETV Bharat / state

आमुचा विठ्ठल भेटला...!.काशीद परिवाराने केली पोलिसांची पूजा - ashadhi ekadashi 2020

कोरोनाच्या काळात दिवसरात्र फ्रंट फुटवर काम करणाऱ्या पोलिसांमध्ये काशीद परिवाराने विठ्ठल-रुक्मिणी शोधली आहे. आज वारीला जाता न आल्याने त्यांनी पोलिसांचीच पूजा केली आहे. विठ्ठल पंढरीत राहून आमच्या आरोग्याची काळजी घेतो.

kashid-family-worships-police-in-kolhapur
.काशीद परिवाराने केली पोलिसांची पूजा
author img

By

Published : Jul 1, 2020, 2:12 PM IST

कोल्हापूर - आषाढी वारी! म्हणजे तमाम विठ्ठल भक्तांचा मेळा ज्ञानोबा माऊलींचा गजर करत, भक्तिरसात तल्लीन होऊन ही माऊली पंढरीची वाट धरते. टाळ मृदुंगाच्या निनादात पायी जात विठुमाऊली समोर हे वारकरी नमस्तक होतात. मात्र, यंदा कोरोनामुळे वारीवर अनेक मर्यादा आल्या आहेत. वारी रद्द केल्याने वारकऱ्यांत निराशा पसरली. मात्र, कोल्हापुरातील काशीद परिवाराने कोल्हापुरातच विठ्ठल-रुक्मीणी शोधली आहे. शाल, आणि श्रीफळ देऊन पोलिसांचे औक्षण केले.

.काशीद परिवाराने केली पोलिसांची पूजा

कोरोनाच्या काळात दिवसरात्र फ्रंट फुटवर काम करणाऱ्या पोलिसांमध्ये काशीद परिवाराने विठ्ठल-रुक्मिणी शोधली आहे. आज वारीला जाता न आल्याने त्यांनी पोलिसांचीच पूजा केली. विठ्ठल पंढरीत राहून आमच्या आरोग्याची काळजी घेतो. त्याप्रकारे कोरोनाच्या काळात पोलीस, प्रशासकीय कर्मचारी आणि डॉक्टर यांनी आमची काळजी घेतली. आषाढी एकादशीला विठालाचे दर्शन मिळालं नाही, पण तीन महिने आमचा विठ्ठल आमच्या सोबत होता, अशी भावना काशीद परिवाराने व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.