कोल्हापूर - जम्मू-काश्मीरच्या राजुरीमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत वीरमरण आलेले गडहिंग्लज तालुक्यातील उंबरवाडी येथील जवान जोतिबा गणपती चौगुले यांच्या पार्थिवावर आज बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांते पार्थिव उंबरवाडीत दाखल झाले आहे.
हेही वाचा... खडसेंनी पवरांची भेट घेतली, पक्षांतराबद्दल अजून भूमिका अस्पष्ट - नवाब मलिक
जम्मू-काश्मीरच्या राजुरीमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत वीरमरण आलेले महाराष्ट्राचे सुपुत्र जोतिबा चौगुले यांचे पार्थिव त्यांच्या उंबरवाडी या गावी दाखल झाले आहे. आजरा व लाकूडवाडी रोडच्या क्रॉसला असलेल्या खुल्या पटांगणात अंत्यविधीची तयारी पूर्ण झाली आहे. साधारण सकाळी आठ वाजता महागावच्या पाच रस्त्यापासून पार्थिवाच्या मिरवणुकीला सुरूवात होणार असून दहा ते साडेदहाच्या सुमारास अंत्यविधी होईल असे शासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आले.
हेही वाचा.. शिवस्मारक घोटाळ्यातून जनभावनांशी खेळणाऱ्या भाजपचा अनैतिक चेहरा उघड; सचिन सावंतांची टीका
- गावाच्या लाडक्या वीर पुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी दारोदारी जोतिबा चौगुले अमर रहे अशा प्रकारच्या रांगोळ्या
- रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी रांगोळी आणि शेकडो होर्डिंग
- सकाळी 9 वाजता शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार