ETV Bharat / state

'ज्या मैदानात आम्ही सर्व एकत्र खेळायचो त्याच मैदानात मित्राचे अंत्यसंस्कार'

हजारोंच्या जनसागराने बुधवारी सकाळी जवान जोतिबा गणपती चौगुले यांना अखेरची मानवंदना दिली. उंबरवाडीमधील खुल्या पटांगणात शासकीय इतमामात हुतात्मा चौगुले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

hutatma jawan jotiba chaugules school friends reactions
हुतात्मा जवान जोतिबा यांचे मित्र
author img

By

Published : Dec 20, 2019, 8:32 AM IST

Updated : Dec 20, 2019, 3:02 PM IST

कोल्हापूर - हजारोंच्या जनसागराच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी जवान जोतिबा गणपती चौगुले यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. उंबरवाडीमधील खुल्या पटांगणात शासकीय इतमामात हुतात्मा चौगुले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जोतिबा चौगुले यांच्या वर्गमित्रांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. ज्या मैदानात आम्ही सर्व लहान असताना एकत्र खेळायचो त्याच मैदानात मित्राचे अंत्यसंस्कार झाले, हे आमच्यासाठी खूपच धक्कादायक असल्याचे सांगत आपल्या लाडक्या मित्राला त्यांनी अखेरचा निरोप दिला.

जवान जोतिबा चौगुले यांच्या मित्रांच्या प्रतिक्रिया

हेही वाचा - 'जोतिबा चौगुले अमर रहे'.... म्हणत हुतात्मा जवानाच्या पत्नीने फोडला हंबरडा

जम्मू-काश्मीरच्या राजुरीमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत जोतिबा चौगुले यांना वीरमरण आले होते.

'ज्या मैदानात एकत्र खेळलो त्या मैदानातच जोतिबाचा अंत्यसंस्कार'

ज्या मैदानात आम्ही लहानपणी एकत्र खेळलो त्याच मैदानात त्याचा अंत्यविधी होत अशसल्याचे पाहून आम्हाला जो त्रास होतोय तो शब्दात सांगू शकत नसल्याचे जोतिबा यांच्या मित्रांनी सांगितले. मात्र, आपल्या भारतमातेसाठी त्याने आपले बलिदान दिले आहे. त्याचा आम्हा सर्वच मित्रांना अभिमान असल्याचेही त्यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.

'माझ्या शहीद जवानांच्या पुस्तकात आता मित्राचा सुद्धा लेख लिहावा लागतोय याचं मोठं दुःख'

शिक्षक झालेल्या महेश उगरे या मित्रानेसुद्धा जवान जोतिबा चौगुले यांच्यासोबतचे काही किस्से सांगितले. आजपर्यंत 30 वीरमरण आलेल्या जवानांवर लेखन केलं आहे. काही दिवसातच प्रकाशनाचा कार्यक्रम होणार होता. पण, आता वर्गमित्रच हुतात्मा झाला आणि यामध्ये तो 31 वा असेल याची कल्पनाही केली नसल्याचे त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.

हेही वाचा - उंबरवाडीच्या मैदानाला शहीद जोतिबा चौगुले यांचे नाव द्या, सकल मराठा महासंघाची मागणी

'आमचं शेवटचं गेट टू गेदरचे नियोजनसुद्धा जोतिबानेच केलं होतं'

दीड महिन्यांपूर्वी म्हणजेच 31 ऑक्टोबरला आम्ही सर्व वर्गमित्र एकत्र जमलो होतो. त्याचे नियोजनच जोतिबा चौगुले यांनी केलं होतं. पण, ही आमची शेवटची भेट असेल असे वाटलंही नसल्याच्या भावना वर्गमित्र विनोद पन्हाळकर यांनी व्यक्त केल्या. शिवाय सर्वच मित्र मिळून जोतिबाच्या कुटुंबीयांना आमच्याकडून ज्या काही मदतीची गरज आहे, ती आता आम्ही करणार असल्याचेही वर्गमित्रांनी सांगितले.

'गणपतीमधल्या सजीव देखाव्यात सैनिकांची भूमिका करायचा'

शाळेतील क्रीडा शिक्षक वासू पाटील यांनीसुद्धा जोतिबासोबतच्या काही आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, छोट्या मोठ्या गोष्टींमधून जोतिबामधला सैनिक झळकायचा. गणपतीमधल्या सजीव देखाव्यात नेहमी सैनिकांची भूमिका तो करायचा. शिवाय त्याने जाणीवपूर्वक भगतसिंग यांची भूमिका केली होती. मला देशासाठी काहीतरी करायचे आहे, त्यामुळे अशी भूमिका मला द्या, असेही त्याने म्हटले असल्याची आठवण पाटील यांनी सांगितली.

'दिलेली शिक्षा हसत खेळत स्वीकारायचा'

जोतिबा ज्या शाळेत शिकला, त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी सुद्धा त्याच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, लष्करी सेवेत जाण्याची जोतिबाला नेहमीच आवड होती. त्याचा नेहमी हसरा चेहरा होता. बालपणापासून त्याला कोणतीही शिक्षा केली तर तो हसत खेळत स्वीकारायचा. जोतिबाने देशासाठी बजावलेली कामगिरी मोलाची असून इतर मुलांनी त्याचा आदर्श घ्यावा, असेही आर. बी. पोवार यांनी सांगितले.

Intro:Body:

ज्या मैदानात आम्ही सर्व लहान असताना एकत्र खेळायचो त्याच मैदानात मित्राचे अंत्यसंस्कार 

(फीड मोजोवरून पाठवले आहे)

अँकर : हजारोंच्या जनसागराने आज सकाळी शहीद जवान जोतिबा गणपती चौगुले यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. उंबरवाडीमधील खुल्या पटांगणात शासकीय इतमामात हुतात्मा चौगुले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जोतिबा चौगुले यांच्या वर्गमित्रांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. ज्या मैदानात आम्ही सर्व लहान असताना एकत्र खेळायचो त्याच मैदानात मित्राचे अंत्यसंस्कार झाले हे आमच्यासाठी खूपच धक्कादायक असल्याचे सांगत आपल्या लाडक्या मित्राला त्यांनी अखेरचा निरोप दिला... 

★ज्या मैदानात एकत्र खेळलो त्या मैदानातच जोतीबाचा अंत्यसंस्कार -

ज्या मैदानात आम्ही लहानपणी एकत्र खेळलो त्याच मैदानात त्याच्या अंत्यविधी होताना जो त्रास होतोय तो शब्दात सांगू शकत नसल्याचे मित्रांनी म्हंटलंय. मात्र आपल्या भारतमातेसाठी त्यानं आपलं बलिदान दिलं आहे त्याचा आम्हा सर्वच मित्रांना अभिमान असल्याचेही त्यांनी म्हंटलय.

★माझ्या शहीद जवानांच्या पुस्तकात आता मित्राचा सुद्धा लेख लिहावा लागतोय याचं मोठं दुःख : 

शिक्षक झालेल्या महेश उगरे या मित्राने सुद्धा काही शहीद जवान जोतिबा चौगुले यांच्यासोबतचे काही किस्से सांगितले. आजपर्यंत 30 शहीद झालेल्या जवानांवर लेखन केलं आहे. काही दिवसांतच प्रकाशनाचा कार्यक्रम होणार होता. पण आता वर्गमित्रच शहीद झाला आणि यामध्ये तो 31 वा असेल याची कल्पनाही केली नसल्याचे त्यांनी म्हंटल. 

★आमचं शेवटचं गेट टू गेदर - विनोद पन्हाळकर

दीड महिन्यांपूर्वी 31 ऑक्टोबर रोजी आम्ही सर्व वर्गमित्र एकत्र जमलो होतो. त्याचे नियोजनच जोतिबा चौगले यांनी केलं होतं. पण ही आमची शेवटची भेट असेल असे वाटलंही नसल्याच्या भावना वर्गमित्र विनोद पन्हाळाकर यांनी व्यक्त केल्या. शिवाय सर्वच मित्र मिळून जोतिबाच्या कुटुंबियांना आमच्याकडून ज्या काही मदतीची गरज आहे ती आता आम्ही करणार असल्याचंही वर्गमित्रांनी बोलून दाखवलं... 

★गणपतीमधल्या सजीव देखाव्यात सैनिकांची भूमिका करायचा - वासू पाटील

शाळेतील क्रीडा शिक्षक वासू पाटील यांनी सुद्धा जोतीबासोबतच्या काही आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले,  छोट्या मोठ्या गोष्टींमधून जोतीबामधला सैनिक झळकायचा. गणपतीमधल्या सजीव देखाव्यात नेहमी सैनिकांची भूमिका करायचा. शिवाय त्याने जणीवपूर्वक भगतसिंग यांची भूमिका केली होती. मला देशासाठी काहीतरी करायचं आहे त्यामुळे अशी भूमिका मला द्या असेही त्याने म्हंटले असल्याची आठवण पाटील यांनी सांगितली. 

★दिलेली शिक्षा हसत खेळत स्वीकारायचा - आर. बी. पोवार, मुख्यद्यापक

जोतिबा ज्या शाळेत शिकला त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी सुद्धा त्याच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, लष्करी सेवेत जाण्याची जोतीबाला नेहमीच आवड होती. नेहमी हसरा चेहरा होता. बालपणापासून त्याला कोणतीही शिक्षा केली तर तो हसत खेळत स्वीकारायचा. जोतिबाने देशासाठी बजावलेली कामगिरी मोलाची असून इतर मुलांनी त्याचा आदर्श घ्यावा असेही आर. बी. पोवार यांनी म्हंटले.

Conclusion:
Last Updated : Dec 20, 2019, 3:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.