कोल्हापूर - जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या 4 दिवसांपासून एकसारखा पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी एकसारखी रिपरिप सुरू आहे. शहरामध्ये आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, मिळालेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार बुधवारी दिवसभरात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. दिवसभरात तब्बल 138 मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. तर एकूण 197.50 मिमी पाऊस गगनबावडा मध्ये झाला आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापुरातील करवीर तालुक्यात सुद्धा मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. मात्र शिरोळ तालुक्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत खूप कमी पाऊस झाला आहे.
संपूर्ण जिल्ह्यात पावसाची तालुकानिहाय नोंद -
हातकणंगले- 12.13 मिमी एकूण 32.13 मिमी
शिरोळ- 8.29 मिमी एकूण 18.43 मिमी
पन्हाळा- 43.29 एकूण 109.29 मिमी
शाहूवाडी- 53.67 मिमी एकूण 126.67
राधानगरी- 38.50 मिमी एकूण 88.33 मिमी
गगनबावडा-138 मिमी एकूण 197.50 मिमी
करवीर- 29 मिमी एकूण 127.36 मिमी
कागल- 24.86 मिमी एकूण 88.14 मिमी
गडहिंग्लज-27 मिमी एकूण 67.14 मिमी
भुदरगड- 39.60 मिमी एकूण 105.80 मिमी
आजरा- 41.50 मिमी एकूण 121.75 मिमी
चंदगड- 71.50 मिमी एकूण 146 मिमी पाऊस यावर्षीच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पडल्याची नोंद झाली आहे.