कोल्हापूर : वादग्रस्त स्टेटस सोशल मीडियावर ठेवल्यामुळे कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत संशयितांना अटक करावी अशी मागणी केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कोल्हापूर शहरात प्रचंड तणाव निर्माण झाला. दरम्यान चौकशीसाठी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हिंदुत्ववादी संघटना आक्रमक : कोल्हापुरातील सदर बाजार आणि अकबर मोहल्ला या परिसरात राहणाऱ्या तरुणांनी मोबाईलवर जातीय तेढ निर्माण होणारे स्टेटस ठेवल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. आक्रमक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर अचानक आंदोलन केल्याने वाहतूक विस्कळीत झाली. स्टेटस ठेवणाऱ्या तरुणांना तात्काळ अटक करा अशी मागणी करत प्रचंड घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. तर आक्रमक झालेला जमाव पोलिसांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. हिंदूवादी कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी चाल करत आक्षेपार्ह स्टेटस ठेवलेल्या तरुणाच्या घरासमोर प्रचंड घोषणाबाजी केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आक्रमक जमावाला पांगवले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली.
वादग्रस्त स्टेटस सोशल मीडियावर ठेवल्यामुळे कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. स्टेटस ठेवणाऱ्या तरुणांना तात्काळ अटक करा अशी मागणी केली. - पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित
पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात : आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सर्वत्र मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जात होता. त्याचवेळी मोबाईलवर आणि सोशल मीडियावर दोन समाजात तेढ होईल असे स्टेटस लावल्याने शहरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. आक्रमक जमावाने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत दोघा संशयताना ताब्यात घेण्याची मागणी केली, पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून दोघा संशयितांना चौकशीसाठी तात्काळ ताब्यात घेतले आहे.
सौम्य लाठीमार : एकीकडे आज राज्यभर शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, दुसरीकडे मात्र सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवून दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य केले. आक्रमक झालेल्या जमावाने बिंदू चौकाकडून दसरा चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील काही दुकानांना लक्ष्य केले. यावेळी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले.
उद्या कोल्हापूर बंदची हाक: ऐन शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशीच कोल्हापूर सारख्या पुरोगामी नगरीत असा प्रकार घडल्याने, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ उद्या कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकत्र येणार आहेत. मात्र पोलीस प्रशासनाने सर्व हिंदुत्ववादी संघटनांना बंद मागे घेण्याचे आवाहन केले आहे. स्टेटस ठेवणारे तसेच बेकायदेशीर जमाव जमवणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले आहे
हेही वाचा -