कोल्हापूर : पावसाच्या संततधारेमुळे पंचगंगेची राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी 17 फूट 2 इंचावर पोहचली असून, सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणारे राधानगरी धरण 54 टक्के भरले आहे. पुढील चार दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला असून जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
जिल्ह्यात 60 टक्के पेरण्या : गतवर्षी जिल्ह्यात 1 लाख 97 हजार हेक्टरपैकी 1 लाख 73 हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली होती. मात्र यंदा अवघ्या 1 लाख 5 हजार 838 हेक्टरवरील म्हणजेच 60 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये भात, सोयाबीन, ज्वारी, भुईमूग आणि नाचणी या पिकांचा समावेश आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष सज्ज : धरण क्षेत्रासह जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातील पूर प्रवण क्षेत्र असलेल्या चिखली, आंबेगाव यासह शिरोळ तालुक्यात एनडीआरएफच्या पथकाने पाहणी केली. अतिवृष्टी झाल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी सांगितले.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा : तुळशी 29.51 दलघमी, वारणा 451.70 दलघमी, दूधगंगा 164.92 दलघमी, कासारी 37.34 दलघमी, कडवी 34.38 दलघमी, कुंभी 42.72 दलघमी, पाटगाव 44.58 दलघमी, चिकोत्रा 13.61 दलघमी, चित्री 14.59 दलघमी, जंगमहट्टी 10.82 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, जांबरे 18.61 दलघमी, आंबेआहोळ 11.81, कोदे (ल.पा) 6.06 दलघमी असा आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी : राजाराम 17.1 फूट, सुर्वे 18.6 फूट, रुई 44.9 फूट, इचलकरंजी 42.6, तेरवाड 39.3 फूट, शिरोळ 30.9 फूट, नृसिंहवाडी 24 फूट, राजापूर 13.3 फूट तर नजीकच्या सांगली 6.6 फूट व अंकली 5.7 फूट अशी आहे.
हेही वाचा -
- Hemadpanti Temple: तब्बल ४६ वर्षांनंतर पहिल्यांदाच मंदिर आले पूर्णपणे पाण्याबाहेर; जाणून घ्या आख्यायिका
- Koyna Dam : महाराष्ट्राची चिंता वाढली; कोयना धरणातून विसर्ग बंद, पाणीसाठ्याची निच्चांकी पातळीकडे वाटचाल
- Khadakwasla dam : खडकवासला धरणात 9 मुली बुडाल्या; 7 जणांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश, दोघींचा मृत्यू