ETV Bharat / state

Hatkanangale Crime News : सावकाराचे संतापजनक कृत्य, अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार - kolhapur crime news

हातकणंगले येथील एका सावकाराने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर ( Hatkanangale Minor Girl Rape ) आली आहे. मुलीने एका स्त्री अर्भकास जन्मही दिला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे.

Crime News
Crime News
author img

By

Published : Jan 10, 2022, 2:10 PM IST

Updated : Jan 10, 2022, 4:42 PM IST

हातकणंगले ( कोल्हापूर ) - येथील एका 61 वर्षीय सावकाराने अल्पवयीन मुलीवर सातत्याने अत्याचार करुन तिला गर्भवती केल्याची धक्कादायक घटना ( Hatkanangale Minor Girl Rape ) समोर आली आहे. हा नराधम पिडीतेचा मामा म्हणून वावरत होता. याप्रकरणी हातकणंगले पोलिसांनी नंदकुमार चंद्रकांत निगवे याला ( Hatkanangale Police Arrested Criminal ) अटक केली आहे.

प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना पोलीस अधिकारी

याबाबत मिळालेली माहिती अशी की, हातकणंगले येथील दर्गा चौक परिसरात नंदकुमार चंद्रकांत निगवे राहतो. तो खाजगी सावकार असून, त्यामाध्यमातून त्याची पिडीत मुलीच्या कुटुंबाशी ओळख होती. तो पिडीत मुलीचा मानलेला मामा म्हणुन वावरत होता. याचाच गैरफायदा घेऊन त्याने मुलीच्या इच्छेविरोधात आपल्या नवीन बांधकामावरील पञ्याच्या शेडमध्ये वारंवार तिच्यावर अत्याचार केला.

निगवेवर सावकारीचे गुन्हेही दाखल

गर्भवती राहिल्यानंतर तिने सांगलीत स्त्री अर्भकाला जन्म दिला. याप्रकरणी कुटुंबीयांनी सांगलीमध्ये संजयनगर पोलीस ठाण्यात ( Sangli Police Station Case Register ) तक्रार दिली. ती तक्रार पुढील कार्यवाहीसाठी हातकणंगले पोलिसांकडे वर्ग करण्यात आली. त्यानुसार हातकणंगले पोलिसांनी नंदकुमार निगवेला अटक केली. न्यायालयाने त्यास 12 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, नंदकुमार निगवे याच्यावर खाजगी सावकारी प्रकरणी हातकणंगले पोलीस ठाण्यात अनेक ( Hatkanangale Police Register Cases ) तक्रारी नोंद आहेत.

हेही वाचा - Anil Deshmukh case : अनिल देशमुखांच्या जामीणावर आज निर्णय

Last Updated : Jan 10, 2022, 4:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.