ETV Bharat / state

Gunaratna Sadavarte On Shrad Pawar : शरद पवार नावाचा व्हेरियंट सहकाराला गिळंकृत करतोय; गुणरत्न सदावर्तेंचा कोल्हापुरात पवारांवर हल्लाबोल - Adv Gunaratna Sadavarte criticizes Pawar

शरद पवार नावाचा व्हेरियंट सहकाराला गिळंकृत करतोय असा हल्लाबोल गुणरत्न सदावर्तें यांनी कोल्हापुरात केला आहे. एसटी बँकेच्या निवडणुकीत शरद पवारांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्यांनी कधीच बँकेच्या निवडणुकीत सर्व सामान्यांना संधी दिली नाही असा आरोप देखील त्यांनी केला आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

Gunaratna Sadavarte On Shrad Pawar
Gunaratna Sadavarte On Shrad Pawar
author img

By

Published : Jun 15, 2023, 3:51 PM IST

Updated : Jun 15, 2023, 4:19 PM IST

गुणरत्न सदावर्ते यांची पत्रकार परिषद

कोल्हापूर : शरद पवार नावाचा व्हेरियंट सहकाराला गिळंकृत करत आहे. हा व्हेरियंट बाजूला हटवण्यासाठी हटवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. शरद पवारांनी एसटी बँकेवर सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना संधी दिली नाही. बँक अडचणीत आणणाऱ्या शरद पवारांना एसटी बँकेच्या निवडणुकीत जागा दाखवू देऊ असे गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले आहे. ते आज कोल्हापूरात बोलत होते.

कोल्हापूरच्या पावन भूमीत दंगल दुर्दैवी : गेल्या आठवड्यात कोल्हापुरात धार्मिक कारणातून झालेली दंगल शाहू नगरी असलेल्या कोल्हापूरसाठी दुर्दैवी आहे. जे गुन्हे दाखल होतात ते गुन्हे दाखल होण्याचं प्रमाण कमी झाले. पूर्वी जाणीवपूर्वक जेलमध्ये डांबले जात होते, ते आता बंद झालं आहे. दाऊद इब्राहिमचा विचार आम्ही या राज्यात चालू देणार नाही. जे जे वाईट असेल त्याला धडा शिकवणार असल्याचेही सदावर्ते म्हणाले.

व्हाट्सएप जिहाद थांबवा : लँड जिहाद, लव्ह जिहाद विरोधात आमचा लढा सुरूच आहे, व्हाट्सएप जिहादचे आव्हान देशासमोर असून यामुळेच धार्मिक कारणातून दंगली घडत आहेत. खा. असदुद्दीन ओवैसी यांचे असे अनेक व्हाट्सएप ग्रुप आहेत. असदुद्दीन ओवैसी अशा ग्रुपमधून निगेटिव्ह स्टेटमेंट करून देशात दुफळी माजवत असल्याची टीका ही त्यांनी केली. सोशल मीडियावर धार्मिक पोस्टमधून कट्टरतावाद वाढत असून याबाबत देशाचे गृहमंत्री अमित शहा, फडणवीस यांना पत्र लिहिणार आहे असेही यावेळी सदावर्ते म्हणाले.

संजय राऊत सारखी मी पत्रकारिता मी पाहिलेली नाही : खासदार संजय राऊत यांच्यासारखी पत्रकारिता मी पाहिलेली नाही, मी ही यापूर्वी पत्रकारिता केली आहे. मात्र, ठळक बातम्या येण्यासाठी रावतांची सुरू असलेली धडपड केविलवाणी आहे. त्यांना काय बोलायचं ते त्यांना काळत नाही. त्याच्या बोलण्याला मी केराची टोपली दाखवतो. माध्यम होती म्हणून मी वाचलोय नाहीतर माझा पुण्यातच एन्काऊंटर झाला असता असा गौप्यस्फोटही गुणरत्न सदावर्ते यांनी केला.

हेही वाचा - Owaisi on love jihad : महाराष्ट्रात किती लव्ह जिहाद झाले डेटा उघड करा, औवेसींचे राज्य सरकारला आव्हान

Last Updated : Jun 15, 2023, 4:19 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.