ETV Bharat / state

Satej Patil corona Positive : सतेज पाटील यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; आज दिवसभरात अनेक ठिकाणी भेट

author img

By

Published : Jan 27, 2022, 12:33 AM IST

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः त्यांनी याबाबत फेसबुक पोस्ट द्वारे माहिती दिली आहे. (Satej Patil corona Positive) तसेच, आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील
कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर - कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. स्वतः त्यांनी याबाबत फेसबुक पोस्ट द्वारे माहिती दिली आहे. तसेच, आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. (Satej Patil corona Positive) दरम्यान, आज दिवसभरात त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त (Guardian Minister of Kolhapur Satej Patil) विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी भेट दिली होती.

सतेज पाटील मागील 2-3 दिवसात अनेकांच्या संपर्कात

पालकमंत्री सतेज पाटील मागील 2 ते 3 दिवसांपासून विविध लोकांच्या संपर्कात आले होते. यामध्ये शासकीय अधिकारी आमदार आदी महत्वाच्या व्यक्तीचाही समावेश आहे. आज प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने सकाळपासूनसुद्धा विविध व्यक्तीच्या ते संपर्कात आले होते. यामध्ये जिल्हाधिकारी, पोलीस प्रमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त यांच्यासह अनेक महत्वाचे अधिकारी त्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले असून सर्वांनीच खबरदारी म्हणून कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

हेही वाचा - Tipu Sultan name Controversy : टिपू सुलतान नामांतराचा प्रस्ताव महापालिकेत आलाच नाही - आदित्य ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.