ETV Bharat / state

येथे माणूसकी ओशाळली.. 51 वर्षे ज्या ग्रामपंचायतीची केली इमानेइतबारे सेवा, शेवटी त्यांनीच केला अत्यंविधी

author img

By

Published : Jul 29, 2020, 7:45 PM IST

माणगाव ग्रामपंचायतीमधील एका ज्येष्ठ शिपायाचे आज निधन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ 10 जणांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यास परवानगी आहे. त्यामुळे शिपाई यांचे भाऊ आणि पुतणे त्यांचा अंत्यविधी करतील असे वाटत होते. मात्र, कुटुंबीय तर सोडाच गावातीलही कुणी त्यांचा मृतदेह उचलण्यास आले नाही. शेवटी ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य आणि सरपंचांनी त्यांचा अंत्यविधी केला.

Funeral
अंत्यविधी

कोल्हापूर - कोरोनामुळे माणुसकीचा अंत झाला आहे, असे गेल्या काही महिन्यात अनेकदा कानावर आले. याचीच प्रचिती कोल्हापूरातील माणगाव गावात आली. ज्या व्यक्तीने गावाची 51 वर्षे अविरतपणे सेवा केली त्यांच्याच अंत्यविधीला गावातील एकही व्यक्ती पुढे धावून आला नाही. माणगाव ग्रामपंचायतीमधील एका ज्येष्ठ शिपायाचे आज निधन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ 10 जणांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यास परवानगी आहे. त्यामुळे शिपाई यांचे भाऊ आणि पुतणे त्यांचा अंत्यविधी करतील असे वाटत होते. मात्र, कुटुंबीय तर सोडाच गावातीलही कुणी त्यांचा मृतदेह उचलण्यास आले नाही. शेवटी ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य आणि सरपंचांनी त्यांचा अंत्यविधी केला.

माणगाव ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी शिपायाचा अंत्यविधी केला

1969 साली माणगाव ग्रामपंचायत मध्ये मृत व्यक्ती शिपाई म्हणून नोकरीला लागले होते. गेले 51 वर्षे त्यांनी अविरतपणे गावाची सेवा केली. इतक्या वर्षात अनेक राजकीय पक्षांचे गटातटाचे आणि टोकाचे राजकारण त्यांनी पाहिले. अनेक सरपंच आणि सदस्यांसोबत त्यांनी काम केले. संपूर्ण गावाची खडान् खडा त्यांना माहिती होती. गावचा नकाशा, गट नंबर, घर नंबर, घरात किती व्यक्ती आहेत, 50 वर्षपासूनच्या सर्व नोंदी दप्तर कोठे आहे याची इत्यंभूत माहिती त्यांना तोंडपाठ होती.

गेल्या आठ दिवसांपासून ते आजारी होते. गावातील खासगी डॉक्टरांकडे त्यांचे उपचार सुरू होते. उपाचारानंतरही प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने त्यांना डॉक्टरांनी कोरोना चाचणी करण्यास सांगितले. गावात आत्तापर्यंत 17 जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे मनात शंका नको म्हणून काल मंगळवारी 'संजय घोडावत कोरोना केअर सेंटर'मध्ये शिपाई स्वॅब तपासणीसाठी गेले होते. आज संध्याकाळी त्यांचा अहवाल येणार होता. मात्र, अहवाल येण्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला.

त्यामुळे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य राजू मगदूम यांनी सरपंच आणि इतर सदस्यांना परीट यांच्या घराजवळ यायला सांगितले. वाट बघुनही नातेवाईक आणि शेजारी-पाजारी कोणीही त्यांच्या अंत्यविधीसाठी पुढे आले नाही. शेवटी ग्रामपंचायतीचे सदस्यच पुढे झाले आणि पीपीई किट घालून त्यांनी ग्रामपंचायतीच्या ज्येष्ठ सेवकावर अंत्यसंस्कार केले.

मनोज परीट, संकेत परीट, राजू मगदूम यांच्यासह गावचे सरपंच अमोल मगदूम, गुंडू हेरवाडे, राहुल पाटील, बाहुबली चौगुले, उपसरपंच राजू गडदले, राजू जगदाळे, अख्तर भालदार, अभिजित घोरपडे, बबन परीट, प्रमोद पाटील, राजू पठाण, प्रशांत तांदळे यांनी अंत्यसंस्कारामध्ये सहभाग घेतला. आज रात्री मृत शिपायाचा कोरोना चाचणी अहवाल येईल. तो निगेटीव्ह येईल किंवा पॉझिटिव्ह मात्र, कोरोनामुळे माणुसकीचा अंत होत चालला आहे, हे मात्र यावरून सिद्ध झाले, अशी प्रतिक्रिया ग्रामपंचायत सदस्यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.