ETV Bharat / state

Stop Widow Tradition : कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एका गावाने घेतला 'विधवा प्रथा बंदीचा निर्णय'

कोल्हापुरातील माणगाव ( Stop widow tradition Mangaon village ) या गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हेरवाड गावाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत आपण सुद्धा विधवा प्रथा बंद ( Stop widow tradition Herwad village Kolhapur ) करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर गावातील प्रत्येक मुलीच्या लग्नात तिला सासरी जाताना भेट म्हणून पैठणी साडी ( Paithani saree gift to girls ) देण्याचा सुद्धा निर्णय घेतला आहे.

माणगाव ग्रामपंचायत
माणगाव ग्रामपंचायत
author img

By

Published : May 11, 2022, 7:57 PM IST

Updated : May 11, 2022, 8:07 PM IST

कोल्हापूर - हेरवाड पाठोपाठ आता कोल्हापुरातील माणगाव ( Stop widow tradition Mangaon village ) या गावाने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेत त्याबाबतचा ठराव मंजूर केला आहे. हेरवाड गावाने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करत आपण सुद्धा विधवा प्रथा बंद ( Stop widow tradition Herwad village Kolhapur ) करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर गावातील प्रत्येक मुलीच्या लग्नात तिला सासरी जाताना भेट म्हणून पैठणी साडी ( Paithani saree gift to girls ) देण्याचा सुद्धा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सध्या परिसरात या गावाचे कौतुक केल्या जात आहे.

माणगाव ग्रामपंचायत कोल्हापूर

'हे' दोन महत्वपूर्ण निर्णय : माणगाव ग्रामपंचायतीच्या झालेल्या ग्रामसभेमध्ये अनेक निर्णय घेऊन तसे ठराव करण्यात आले. त्यामधे दोन महत्त्वाचे ठराव करण्यात आले आहेत. 1) माणगाव गावामधे पूर्वापार चालू असलेली विधवा प्रथा बंद करणेत यावी, असा ठराव करणेत आला. विशेष म्हणजे हा ठराव होण्यापूर्वीच ग्रामपंचायत सदस्या संध्याराणी जाधव यांनी याची सुरुवात आपल्या कुटुंबापासून केली. 2) माणगाव गावातील मुलीच्या लग्नात त्या गावकन्येचा सन्मान आणि तिला आशीर्वाद म्हणून माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने 2500 रुपये किंमत्तीची पैठणी माहेरची साडी भेट म्हणून देणेत येणार आहे.

आदर्श ग्रामपंचायतींमध्ये माणगाव नेहमीच आघाडीवर : दरम्यान, माणगाव हे ते ठिकाण आहे जिथे सुमारे 100 वर्षांपूर्वी 1920 साली शाहू महाराजांनी शोषित लोकांची अस्पृश्यता परिषद आयोजित केली होती. ज्यामध्ये त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना भावी नेते म्हणून घोषित केले होते. माणगाव परिषद म्हणून त्या परिषदेला आजही ओळखले जाते. खऱ्या अर्थाने याच गावातून समतेचा संदेश सर्वत्र गेला आणि त्याची सुरुवात झाली. या गावात नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. ग्रामपंचायत सरपंच राजू मगदूम, उपसरपंच तसेच इतर सदस्य नेहमीच निर्णयांना पाठिंबा देताना पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे या गावाने जिल्ह्यात सुद्धा एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या आदर्श ग्रामपंचायतींमध्ये माणगाव नेहमीच आघाडीवर राहिले आहे. शिवाय याच ग्रामपंचायतीने महावितरण विरोधात सुद्धा मोठा लढा दिला होता ज्याचे राज्यातील अनेक ग्रामपंचायतींनी अनुकरण केले होते. त्याच गावाने आता हेरवाड गावाने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करत आपणही विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतला. शिवाय गावातील प्रत्येक मुलगीच्या लग्नात तिला गावाकडून भेट द्यावी, या दृष्टिकोनातून माहेरची साडी म्हणून पैठणी देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - Herwad Village : कोल्हापुरातील हेरवाड ग्रामपंचायतीने केली विधवा प्रथा बंद; कुंकू पुसण्याची, मंगळसूत्र काढण्याचीही गरज नाही

Last Updated : May 11, 2022, 8:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.