कोल्हापूर - राफेल विमानाची ज्या पद्धतीने पूजा करण्यात आली त्यात काहीच गैर नसल्याचे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हटले आहे. ज्याप्रकारे सीमोल्लंघनाला संपूर्ण देशात शस्त्रांची पूजा केली जाते, त्याच पद्धतीने ही देखील पूजा केली असल्याचे सांगत सावंत यांनी राफेलच्या पूजेचे समर्थन केले आहे.
हेही वाचा - शिवसेनेने पाच वर्षे सत्तेत असताना झोपा काढल्या का? - अजित पवार
दोन दिवसांपूर्वी भारतामध्ये राफेल विमान दाखल झाले. या विमानाची संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी राफेलच्या चाकासमोर लिंबू ठेवून विधीवत पूजा सुद्धा केली. यावरून सर्वत्र टीका केली जात होती. यावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोल्हापुरात मतं व्यक्त केले. भाजपचे दक्षिण कोल्हापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी आले होते.
हेही वाचा - राहुल गांधींनी मैदानातून पळ काढल्यानेच पक्षासमोरच्या अडचणींत वाढ; खुर्शीद यांचा घरचा आहेर
सावंत म्हणाले, काश्मीरमध्ये शांतता आहे. उलट पूर्वीपेक्षा काश्मीरमधले वातावरण सुरळीत आणि दहशतमुक्त झाले आहे. तसेच काही ठिकाणी छोटे मोठ्या घटना झाल्या असल्या तरी सद्यपरिस्थितीत तेथील वातावरण भयमुक्त झाले असल्याचेही सावंत म्हणाले.
कोल्हापुरातील राजकारणावर बोलताना सावंत म्हणाले, कोल्हापूरातील वातावरण युतीमय आहे, पण काही ठिकाणी युतीमध्ये बंडखोरी झाली असली तरी सर्वच ठिकाणी युतीचेच उमेदवार निवडून येतील असा विश्वास असल्याचे सावंत म्हणाले.
हेही वाचा - तुम्ही 'नास्तिक' असाल आम्ही नाही, राफेल 'पूजना'ला 'तमाशा' म्हटल्यावरून खरगेंना घरचा आहेर