ETV Bharat / state

Gatari Amavasya : मासळी मार्केटमध्ये ग्राहकांची गर्दी; गटारी अमावस्याच्या निमित्ताने कोल्हापूरकर मारणार मटणावर ताव

आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस असल्याने कोल्हापुरातील बिंदू चौकातील मासळी मार्केटमध्ये ग्राहकांनी गर्दी केली आहे. कोल्हापुराजवळील कोकणातून ताज्या माशांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे चिकन मटणासोबतच मासळी खरेदीसाठी नागरिकांनी सकाळपासूनच मटण बाजारात गर्दी केली आहे.

Gattari Amavasya
Gattari Amavasya
author img

By

Published : Jul 16, 2023, 9:28 PM IST

कोल्हापूर : आज आषाढ महिन्याचा शेवटचा रविवार असून मंगळवारपासून श्रावण महिन्याला सुरवात होणार आहे. त्यामुळे मांसासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरात गटारी अमावस्या साजरी करण्याचा बेत आखला जात आहेत. चिकन मटणासोबतच मासळी खरेदीसाठी नागरिकांनी सकाळपासूनच मटण बाजारात गर्दी केली आहे. सध्या पावसाळा असल्याने खवय्यांसाठी ताजी मासळी उपलब्ध होत आहे. मासेप्रेमींसाठी ही खास पर्वणी ठरली आहे. कोल्हापूर म्हटले की, प्रत्येक कोल्हापूरकरांच्या घरी चिकन, मटणासोबत लाल, पांढरी, सोल करी असते, मात्र आता श्रावण सुरू होणार असल्याने मांसप्रेमींसाठी हा शेवटचा रविवार असल्याने नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.

मटण बाजारात नागरिकांची गर्दी : श्रावण महिना हिंदूंसाठी पवित्र मानला जातो. कारण श्रावण महिन्यापासून हिंदू सण सुरू होतात. त्यामुळे श्रावण महिन्यात अनेक लोक मांसाहार वर्ज्य करतात. कोल्हापूर हा मांसप्रेमीचा जिल्हा आहे. जेथे प्रत्येक रविवारी घरी मटण, चिकन असते. परंतु पावसाळ्यात बरेच लोक ताजे मासे खाण्यासाठी मटण मार्केटला भेट देतात. मंगळवारपासून श्रावणमास सुरू होणार असल्याने आज सकाळपासूनच मटण बाजारात अनेक मांसप्रेमींनी गर्दी केली होती. श्रावण महिना सुरू झाल्याने मटण, चिकन खाणे शक्य नसल्याने आज सुट्टी असल्याने अनेकांनी कोल्हापुरी स्पेशल टोंबक व्हाईट ग्रेव्ही चिकन मटण आणि मासेसोबत खाण्याचे बेत आखले आहेत.

माशांची आवक मोठ्या प्रमाणात : आता पावसाला सुरुवात झाली असून कोल्हापुराजवळील कोकणातून ताज्या माशांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरही सर्वसामान्यांना परवडणारे ठरले आहेत. त्यामुळे मासळी खरेदीसाठी कोल्हापुरातील बिंदू चौकातील मासळी मार्केटमध्ये ग्राहकांनी गर्दी केली आहे. तर अनेकांना खेकडे खाण्याचा मोह आवरता येत नाहीये.

सध्याच्या माशांच्या किमतींवर एक नजर: बांगडा 240 ते 200 रुपये किलो, पापलेट 1200 ते 800 रुपये किलो, बोंबील 320 ते 360 रुपये किलो, मांदेली 200 रुपये किलो.

हेही वाचा - Gutari Amavasya : गटारीनिमित्ताने भाजपतर्फे मोफत कोंबडी वाटप; पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.