कोल्हापूर : फोक्सकोन वेदांता प्रकल्पानंतर आता आणखी एक प्रकल्प गुजरातला (Tata Airbus project to Gujarat) गेल्याचे समोर आले आहे. यानंतर सध्या राज्य सरकारवर जोरदार टीका होत असून भाजप शिंदे सरकार राज्याला मागे ढकलण्याची प्रायोरिटीचे सरकार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे राजकीय वजन कमी पडतं हे आता लोकांना कळत असल्याचे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील (Satej Patil criticizes Shinde govt) यांनी म्हटले आहे. तसेच देशाचे केंद्रातील सरकार केवळ एका राज्यासाठी चालत आहे का? असा प्रश्नही निर्माण होत असल्याचे सतेज पाटील (Satej Patil criticizes Central Govt) म्हणाले आहेत. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत (Satej Patil PC Kolhapur) होते. तसेच बच्चू कडू यांनी केल्या पंधरा वर्षांचे काही मिळवलं त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असून पडद्यामागे काय झालं हे जनतेला कळालंच पाहिजे असेही सतेज पाटील म्हणाले आहेत. (Kolhapur Latest News)
गुजरात हा वेगळा देश निर्माण करण्याचा प्रयत्न - फॉक्सकोन वेदांता पाठोपाठ महाराष्ट्राच्या हातातून टाटा एअरबस चा प्रकल्प ही गुजरातच्या बडोद्यामध्ये गेला आहे याची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी करणारा असून यावर आता विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे. भाजप शिंदे सरकार हे राज्याला मागं ढकलण्याच्या प्रायोरिटीचा सरकार असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे राजकीय वजन कमी पडत आहे हे आता जनतेस दिसून येत आहे. सर्व प्रकल्प गुजरातला घेऊन जाण्याचा घाट घातला जात असून केंद्रातल्या सरकार देखील केवळ एका राज्यासाठी चालू आहे का असा प्रश्न निर्माण झाला असल्याचे माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे.डायमंड इंडस्ट्री, बुलियन ट्रेडिंग असे अशा महत्त्वाच्या केंद्र गुजरातला गेली. म्हणजे गुजरात एक वेगळा देश निर्माण होणार आहे का अशी शंका आता निर्माण होऊ लागले आहे देशातील सर्व संपत्ती एका राज्यात घेऊन जाणे हे बाकीच्या राज्यांवर अन्यायकारक असल्याचेही पाटील म्हणाले आहेत. गेल्या काही दिवसात एअरलाइन्स चे प्रमुख ऑफिसस मुंबईहून नोएडा ला गेले यावरून मुंबईचे महत्त्व कमी करणे हा एकच अजेंडा भाजपचा आहे असे दिसून येत असल्याचे ही त्यांनी म्हंटले आहे.
पडद्यामागे नेमकं काय घडलं हे महाराष्ट्राच्या जनतेलाही कळलं पाहिजे: शिवसेनेमध्ये बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटासोबत गेलेले बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये सध्या जोरदार वाद सुरू आहे यावरच बच्चू कडूंनी सरकारला अल्टिमेटम दिला असून वेळ आल्यावर योग्य निर्णय घेणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे याबाबत बोलताना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले, पंधरा वर्षे बच्चू कडू आमच्या सोबत आमदार म्हणून काम करतात. ते चळवळीतील एक प्रामाणिक कार्यकर्ता आहेत.पंधरा वर्षात बच्चू कडूंनी जे मिळवलं त्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.त्यामुळे याच स्पष्टीकरण झालंच पाहिजे.पडद्यामागे नेमकं काय घडलं हे महाराष्ट्राच्या जनतेलाही कळलं पाहिजे.कारण आता बच्चू कडू यांच्या राजकीय अस्तित्वासाठी सत्य बाहेर येणं महत्त्वाचा आहे. त्यांचे अस्वस्थता स्वाभाविक आहे तसेच त्यांच्या स्वभावाप्रमाणे निर्णय घेऊ शकतात.सरकार येताना सगळ्यांना अनेक आश्वासन दिली गेली आहेत मात्र या आश्वासनांची पूर्तता करणं आता अवघड आहे.म्हणूनच अनेकांमध्ये ही अस्वस्थता निर्माण झाली आहे असे सतेज पाटील म्हणाले आहेत.