कोल्हापूर - शाळेच्या पहिल्या दिवशी शिक्षकांनी आपल्या नवीन प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांना चक्क सजवलेल्या जिप्सीमधून स्वागत केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यातल्या दिगवडे इथल्या शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी मुलांचे हटके स्वागत केले आहे. दरवर्षी या शाळेत मुलांचे वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत होत असते. यंदाही या शाळेने आपली परंपरा जपत मुलांना शाळेबाबत गोडी निर्माण होण्यासाठी सजवलेल्या जिप्सी मधूनच आणले. आगळ्या वेगळ्या प्रकारे झालेल्या स्वागतामुळे मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य सुद्धा वेगळाच अनुभव देणारे होते. विशेष म्हणजे अतिशय ग्रामीण भागात सुद्धा शिक्षक मराठी शाळा टाकाव्यात यासाठी करत असलेले प्रयत्न उल्लेखनीय ( first day student came jeep in school in panhala ) आहेत.
ढोल ताशा आणि सजावट केलेली जिप्सी - दरम्यान, पहिला दिवस म्हटले की हटके स्टाइलने नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत केल जाते. शहरात असणारी ही प्रथा आता कोल्हापूरच्या ग्रामीण भागात सुद्धा प्रत्येक वर्षी पोहचली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील दिगवडे इथल्या प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक बाजीराव पाटील आणि इतर सर्वच शिक्षक शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे मुलांचे स्वागत करत आहेत. रंगीबेरंगी फुगे आणि विविध रेबिन बांधून सजवलेल्या ओपन जीप मधून विद्यार्थ्यांचे यंदा स्वागत केले. या सोबतच शाळेच्या बँड पथकानेही या नवीन विद्यार्थ्यांचे अगदी वाजत गाजत स्वागत केले.
सर्व नवीन विद्यार्थ्यांची मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्यावरून काढण्यात आली. तसेच, त्यांचे उत्साहात शाळेत स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीत गावकरी ही सहभागी झाले होते. नव्या विद्यार्थ्यांची आगळ्या वेगळ्या स्टाईलने काढलेली मिरवणूक सर्वत्र चर्चेचा विषय ठरली. यावेळी मुख्याध्यापक बाजीराव पाटील, सर्व शिक्षक स्टाफ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सागर पाटील, मारुती पाटील, रमेश जाधव, संग्राम पाटील, शिवाजी काळे, भानुदास पोवार, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.
हेही वाचा - Nashik School : स्कुल चले हम! विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरमधून थेट शाळेत एंन्ट्री